घरताज्या घडामोडी2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होणार - मुख्यमंत्री शिंदे

2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होणार – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होईल. त्यानंतरही काम सुरूच राहणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होईल. त्यानंतरही काम सुरूच राहणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. (Ram idol to be installed in January 2024 Says CM Eknath Shinde vvp96)

“राम मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते. देशातील हिंदुत्वावादी विचारांच्या रामभक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर व्हावे. अयोध्या व राम मंदिर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. रामाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील काही ट्रस्टींनी जुनी अवशेष दाखवली. तसेच, मंदिर बनवण्याचे काम पाहिले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू – शिंदे

“मागच्या वेळी आलेलो तेव्हा प्लॅटफॉर्म होते, आता खांबे उभी करण्यात आली आहेत. छतही तयार होत आहे. वेगाने काम होत असून आता राम मंदिर तयार होत आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू झाले आणि आता पुढे जात आहे. 2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होईल. त्यानंतरही काम सुरूच राहणार आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“मुख्यमंत्री झाल्यावर सर्व आमदार खासदार यांच्यासोबत दशनाला आलो. यापूर्वी मी नियोजन करण्यासाठी यायचो, पण आता कार्यकर्ता यांनी नियोजन केले. मंगल पवित्र वातावरण तयार केले आहे. आपले संपूर्ण सरकार आले होते, मंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते. संध्याकाळी शरयू नदीवर आरती करणार आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा – अयोध्या व राममंदिर आमच्या आस्थेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -