घरमुंबईकृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर -...

कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आधी सूरत आणि आता गुहाटीला आपल्यासोबत जवळपास 40 आमदारांना हॉटेलवर ठेवले आहे. यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्मान झाली आहे. यातच राज्यात मानसून सुरू झाला आहे. या पारश्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.

काय म्हणाले राऊत – 

- Advertisement -

या ट्विटमध्ये खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे.

संजय राऊतांनी आमदारांन दिली होती धमकी –

- Advertisement -

हम हार मानने वाले नही है, हम जितेंगे, फ्लोअर टेस्टमध्ये जिंकू आणि जर लढाई रस्त्यावर झाली, तर तिकडेसुद्धा जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, ते मुंबईत येऊ शकतात. आम्ही पूर्ण तयारी केलीय, तुम्ही आता याच हे आमचे आव्हान आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत, शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देसाईंमध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -