घरमुंबईसर्व पक्षीय नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तळेगाव टोलनाका बंद करण्याची केली...

सर्व पक्षीय नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तळेगाव टोलनाका बंद करण्याची केली मागणी

Subscribe

राज ठाकरेंचा टोल नाका बंद करण्याच्या मागणीला पाठींबा

पुण्यातील सोमाटणे टोल नाका बंद करण्याप्रकरणी सर्व पक्षीय नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. तळेगाव येथील टोलनाका बंद करण्यात यावा अशी मागणी तळेगावमधील नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी या सर्वपक्षीय नेत्यांनी तळेगाव पोलिसांना निवेदनही दिले आहे. तसेच आयआरबीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. परंतु ही बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज राज ठाकरेंकडे येत्या २१ तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाला पाठींबा देण्याची मागणी केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपला मोर्चाला आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या मागणीला पूर्ण पाठींबा असल्याचे सांगितले आहे.

प्रवक्त जनसेवा संघ समितीचे मिलिंद अच्च्युत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगावमधील सोमाटणे फाटा येथील सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. तसेच टोलनाका प्रकरणातही मनसेने उत्तम काम केले आहे. म्हणुन आम्ही राज ठाकरेंच्या भेटीला आलो असल्याचे सांगितले. टोलनाका उभारणी करताना दोन टोलनाक्यामधील अंतर हे ६० किलोमीटर असावे असा जीआर आहे. तसेच तळेगाव सोमाटणे येथे उभारण्यात आलेला टोलनाका भक्तीशक्ती येथे उभारण्यात येणार होता. परंतु तो सोमाटणे नाक्यावर उभारण्यात आला आहे. या टोलनाक्याला १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

- Advertisement -

सोमाटणे टोलनाका आयआरबीच्या अंतर्गत सुरु आहे. तळेगाव आणि टोलनाका परिसरातील नागरिकांची टोलवसूली करुन लूट सुरु आहे. या सर्व प्रकारावर सर्वपक्षीय नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,आरपीआय अशा पक्षांचा समावेश आहे. टोल नाका प्रकरणात मनसेने अनेक कामे केली आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे.

शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या २१ फेब्रुवारीला व्यापक स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला आहे. सदर टोलनाका हा स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या टोलनाक्याचा कोणताही फायदा नागरिकांना होत नाही आहे. परंतु टोलनाक्याच्याआड नागरिकांची लूटमार केली जात असल्याचे सर्व पक्षीय नेत्यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -