घरमुंबईअंबरनाथ, बदलापुरातील जलप्रदुषण पालिका, एमआयडीसी प्रशासन जबाबदार

अंबरनाथ, बदलापुरातील जलप्रदुषण पालिका, एमआयडीसी प्रशासन जबाबदार

Subscribe

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण सचिव ई रवींद्रन यांचा आरोप

अंबरनाथ आणि बदलापूर येथे होणार्‍या जल व वायू प्रदूषणास तेथील नगरपालिका आणि एमआयडीसी जबाबदार असून हे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई रवींद्रन यांनी केला आहे .

अंबरनाथ येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने एस थ्री या हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ई रवींद्रन यांनी हा आरोप केला. ते पुढे म्हणाले की येथील कारखानदारांनी सीईपीटी प्लांट बसवणे आवश्यक असून त्याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील कारखानदार त्या सूचनेचे पालन करीत नाहीत. अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करून ( एसटीपी प्लांट ) सुरू करण्याची अनेकदा ताकीद दिली आहे. मात्र हे प्लांट बंद असल्याने हे सांडपाणी वालधुनी नदीत मिसळते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी सोडण्यासाठी फॉरेस्ट नाका ते कल्याण खाडीपर्यंत या 17.5 किमीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव आता विचाराधीन आहे.

- Advertisement -

अंबरनाथ नगरपालिकेद्वारे दररोज 65 एमएलडी सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. तर आनंदनगर एमआयडीसी परिसरातून केवळ 3.5 एमएलडी सांडपाणी सोडले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाईपलाईन द्वारे कल्याण खाडीत ते पाणी सोडण्याची परवानगी आम्ही मागितली आहे. मात्र हे प्रकरण अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे.
– उमेश तायडे, कारखानदार संघटना अध्यक्ष, ‘आमा’

अंबरनाथ नगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वडोल गाव आणि चिखलेली येथे एसटीपी प्लांट बनविलेले आहेत. ते सुरळीतपणे सुरू आहेत. 28 एमएलडी सांडपाणी दररोज प्रक्रिया करून सोडले जाते.सर्वोच्च न्यायालयात प्रदूषणाबाबत आम्ही बाजू मांडतांना प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली आहे. जे सांडपाणी वालधुनी नदीत जात आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेचे असून त्यांचा देखील स्वतःचा एसटीपी प्लांट वडोल गाव येथे तयार होत आहे.
– राजेंद्र हवळ, पाणीपुरवठा अभियंता, अंबरनाथ नगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -