घरमुंबईVideo : अमित ठाकरेंचा 'हा' व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Video : अमित ठाकरेंचा ‘हा’ व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Subscribe

मेट्रो ३च्या कारशेडसाठी आरेतील २७०० झाडांची कत्तल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अमित ठाकरेंनी विरोध दर्शवला आहे.

‘मेट्रो ३’चे कारशेड कांजूरमार्गला होणार अशी चर्चा होती. मात्र, हे कारशेड कांजूरमार्गला न होता आरेमध्ये तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कारशेडसाठी आरेतील सुमारे २७०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी या सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आता या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया केली आहे. आरेतील झाडे वाचवा असे कॅप्शन देऊन अमित यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये अमितने मेट्रो कारशेडला आपला विरोध नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला विकास हवा. परंतु, पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको, अशी भूमिका अमित यांनी मांडली आहे.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले अमित ठाकरे?

‘चार दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे कॉलनीतील २७०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअगोदर महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीएचे पदाधिकारी यांनी आरेतील स्थानिकांशी चर्चा केली. या चर्चेत ८२ हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या. जर ८२ हजार लोकांच्या तक्रारी असतील आणि तरीही झाडे तोडण्याचा निर्णय आपण घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत. विकास हा नक्कीच व्हावा. परंतु, निसर्गचा बळी देऊन नाही. आपल्यावर ग्लोबल वॉर्मिंगचे खूप मोठे संकट आले आहे. हे संकट फक्त मुंबई, महाराष्ट्र आणि जगावर आले आहे. सध्या अॅमेझॉन जंगलाला मोठी आग लागली आहे आणि ही आग विझवण्यासाठी संपूर्ण जग एकवटले आहे आणि याप्रती सर्व हळहळ व्यक्त करत आहेत. हे सर्व चालू असताना मुंबईचा श्वास असणारे आरे आपण नष्ट करायला निघालो आहोत, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आवाहन करतो की, व्यक्त व्हा. मी तुमच्या आणि निसर्गासोबत आहे’, असे अमित ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -