घरमुंबईआंग्रीयाला विदेशी पर्यटकांनी तारले

आंग्रीयाला विदेशी पर्यटकांनी तारले

Subscribe

२० हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांचा आंग्रीयामधून प्रवास

महाराष्ट्र आणि गोव्याच्या पर्यटनाला नवा आयाम देणारी बहुचर्चित ‘आंग्रीया’ या देशातील पहिल्यावहिल्या आंतरदेशीय क्रूझ सेवेला देशविदेशी पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ‘आंग्रीया’ क्रूझमधून देशी-विदेशी जवळपास २० हजार पर्यटकांनी प्रवास केला आहे. आंग्रीया सुरु होण्यापूर्वी हा पांढर हत्ती अरबी सुमद्रात चालणार का, अशी शंका होती. मात्र आता या आंग्रीयाला विदेशी पर्यटकांनी तारले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांत विदेशी पर्यटकांनी आंग्रीयाची बुकिंग करून ठेवली आहे, अशी माहिती आंग्रीया क्रूझच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

‘आंग्रीया सी-ईगल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहाय्याने ही मुंबई ते गोवा क्रूझ सेवा सुरु करण्यात आली आहे. याला दोन महिने पूर्ण झाले आहेत. ही आंग्रीया क्रूझ चालेल का अशा शंका अनेकांच्या मनात सुरुवातीला होत्या. मात्र या आंग्रीया क्रूझला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: मुंबई ते गोवा अशी आंग्रीयाची क्रूझ सफारी करण्यासाठी देशी पर्यटकांनी विदेशी पर्यटकांना चांगलीच पसंती दाखवली आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षात स्वागतासाठी पर्यटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतकेच नव्हे तर विदेशी पर्यटकांनी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यासाठीही बुकिंग करून ठेवली आहे. मागील दोन महिन्यांत मुंबई ते गोवा अशा सरासरी ५२ आंग्रीया क्रूझच्या फेर्‍या झाल्या आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी या आंग्रीया क्रूझमधून प्रवास केला आहे. त्यामुळे भविष्यात आंग्रीया क्रूझ संख्या वाढावी लागणार आहे.

- Advertisement -

मुंबई ते गोवा एक दिवस आड ही आंग्रीया क्रुझ सेवा सध्या सुरु आहे. मुंबईहून रोज संध्याकाळी ५ वाजता रवाना झालेली क्रूझ दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्याला पोहचते. क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट्स, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असे बरेच काही आहे. आंग्रीया क्रूझवर १०४ खोल्या असून सुमारे ३५० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास चालतो. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आहे. चार ते चौदा व्यक्तींच्या कुटुंबासह जोडप्यांसाठी खास खोल्यांची सुविधा क्रूझमध्ये करण्यात आली आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. त्यामुळे पर्यटक आंग्रीया क्रूझला चांगलीच पसंती देत आहेत.

विदेशी पर्यटकांची संख्या वाढली
महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळी भेट देणार्‍या विदेशी पर्यटकांना आंग्रीया क्रुझचे विशेष आकर्षण आहे. सुरुवातीला आंग्रीया क्रूझमध्ये अपेक्षित विदेशी पर्यटक दिसत नव्हते. मात्र मागील ख्रिसमसच्या सुट्यापासून विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. सोबतच आता या आंग्रीया क्रुझची माहिती देश-विदेशात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक मुंबई ते गोवा आंग्रीया क्रूझ प्रवास करण्यासाठी वळले आहेत. परिणामी पुढल्या दोन ते तीन महिन्यांची आतापासून विदेशी पर्यटकांसाठी आंग्रीया क्रुझची बुकींग सुरू आहे. सद्यस्थितीत १० ते १५ देशी पर्यटकांमागे २ विदेशी पर्यटक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आंग्रीया क्रूझची क्रेज देशी पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटकांमध्ये सुद्धा वाढत आहे.

- Advertisement -

मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई अशा सागरी प्रवासासाठी आंग्रीया क्रूझ सेवा सुरु करून दोन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होत आहेत. या आंग्रीया क्रूझ सेवेला मुंबई आणि गोवातील पर्यटकांकडून प्रतिसाद मिळत आहेत. मात्र यापेक्षा विदेशी पर्यटकांची सुद्धा प्रतिसाद उत्तम मिळत आहेत. महाराष्ट्र आणि गोवातील समुद्र किनार्‍यापट्टीवर पर्यटकांना चालना देण्यासाठी आंग्रीया क्रुझ आज एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
– सिद्धार्थ नवलकर, कार्यकारी संचालक, आंग्रीया क्रूझ

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -