घरमुंबईनेतृत्व सिध्द करण्यासाठी शशांक राव यांची खेळी - अनिल परब

नेतृत्व सिध्द करण्यासाठी शशांक राव यांची खेळी – अनिल परब

Subscribe

शिवसेनेला बदनाम करण्याचे काम शशांक राव यांच्या माध्यमातून इतर पक्षांनी साध्य केले आहे. शिवसेना कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत बेस्ट संपावरुन कामगार नेते शशांक राव यांच्यासोबत विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. बेस्ट संपाचे निमित्त पुढे करुन शिवसेनेवर टीका केली जात असून स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी ही खेळी केली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करण्याचे काम शशांक राव यांच्या माध्यमातून इतर पक्षांनी साध्य केले आहे. शिवसेना कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. स्वत:चे नेतृत्व सिध्द करण्यासाठी शशांक राव यांनी ही सर्व खेळी केली असून शशांक राव यांचे भाषणाचे स्क्रिप्ट दुसरे कोणी तरी लिहीत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. जर कोर्टात गेले नसते तर वेगळा निर्णय आला असता असं देखील त्यांनी सांगितले आहे.

कोर्टाच्या निकालाची प्रत वाचावी 

मुंबई महापालिका आणि बेस्ट यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हा कामगार आणि बेस्टमध्ये संघर्ष झाला तेव्हा शिवसेने महत्वाची भूमिका बजावली आहे. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही, शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेने मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. या संपादरम्यान सुवर्णमध्य साधता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. जेव्हा संप मागे घेतला तेव्हा कोर्टाच्या निकालाची प्रत हातात आली नव्हती. कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत आणि शशांक राव यांनी कामगारांना जे सांगितले त्यात तफावत आहे. त्यामुळे कोर्टाच्या निकालाची प्रत वाचून त्याचा अभ्यास करा, असे अनिल परब यांनी सांगितले. दरम्यान, शशांक राव यांनी ९ दिवस कामगारांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना फसवण्याचे काम केले

ज्युनियर कामगारांचा विचार प्राधान्यांने व्हावा. पण, सगळ्या कामगारांचा प्रश्न एकत्रितपणे सुटावे ही शिवसेनेची भूमिका होती. ज्युनिअर कामगारांसंदर्भातील मागणी शशांक राव यांनी ताणून धरली. पण आम्हाला सर्व कामगारांचा प्रश्न सुटावा, असे वाटत होते. पण शशांक राव संप ताणत होते म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. ज्यांच्या पगारात पुढच्या महिन्यात ७ हजार वाढवून येतील त्यांनी पेमेंट स्लिप दाखवावी मी माझे शब्द मागे घेईन, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना फसवण्याचे काम केले जात आहे. पालिकेमध्ये बेस्टचे विलीनीकरण करायचे आहे याचा ठराव पालिकेत आगोदरच झाला होता. मात्र शशांक राव यांच्या युनियनने याला कोर्टात चॅलेंज केले असल्याचे परब यांनी सांगितले.

दुसऱ्याने स्क्रिप्ट लिहून दिली

शिवसेनेनं कामगारांच्या बाजूने जी भूमिका घेतली होती तीच भूमिका कोर्टाने घेतली आहे. जनतेला वेठीस धरू नये, कामगारांना नाहक त्रास होऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्याने लिहिले असावे, असा आरोप परब यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे राजकारण केले गेले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संप ताणला. नारायण राणे, कपिल पाटील, आशिष शेलार यांनी संपात मदत केल्याचे शशांक राव यांनी सांगितले. त्यामुळे संपात कुणाचे अदृश्य हात आहेत हे यावरून समोर आले असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.

- Advertisement -

विलीनकरणाला शिवसेनेचा विरोध नाही

शिवसेनेचा विलीनीकरणाला विरोध नाही. संप करून काही मिळत नाही. चर्चेतून मार्ग निघतो. हे आता या संपावरून पालिका कर्मचाऱ्यांना समजले. त्यामुळे ते आता शशांक राव यांच्या बोलण्याला बळी पडणार नाहीत असं परब यांनी सांगितले. शशांक राव यांना योग्य ट्रेनिंग दिले नसावे, असं त्यांनी सांगितले आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शशांक राव यांनी संप ताणला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करणे हा अदृश्य हाताचा हेतू होता आणि तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. शिवसेनेला कधी कुठल्या दबावाला बळी पडणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -