घरमुंबईमहिला जिल्हाधिकार्‍याची अवयवदानची घोषणा!

महिला जिल्हाधिकार्‍याची अवयवदानची घोषणा!

Subscribe

भावाच्या लग्नसोहळ्यात घेतला निर्णय

मूळची उल्हासनगरची रहिवासी असलेल्या आणि सध्या केरळ राज्यातील येरणा कुलमच्या जिल्हाधिकारी प्रांजल पाटील यांनी आपल्या भावाच्या लग्नसमारंभात अवयवदानची घोषणा केली. नुसती घोषणा न करता डॉक्टरांच्या उपस्थितीत अवयवदान अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील पूर्ण केली. वयाच्या ८ व्या वर्षी प्रांजलला अंधत्व आले होते. मात्र या अंधत्वावर मात करत त्या दोनदा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २८ वर्षीय प्रांजल पाटील यांच्या आयुष्याचा प्रवास अतिशय खडतर आणि तितकाच प्रेरणादायी आहे. त्या तिसर्‍या इयत्तेत असताना वयाच्या आठव्या वर्षी हळूहळू दृष्टी लोप पावत गेली. पुढे त्यांना पूर्ण अंधत्व आले.

ज्या समाजाने आपल्याला आजवर जो काही मान-सन्मान दिला. त्याच्यासाठी आपले पण काही देणे लागते, अशी भावना प्रांजलने अनेकदा व्यक्त केली होती. ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. नुकताच प्रांजलचा मुलगा निखिल याचा विवाह सोहळा उल्हासनगरमध्ये पार पडला. या सोहळ्यातच अवयवदान करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय प्रांजल आणि तिचे पती कोमल सिंह पाटील यांनी घेतला. त्यासाठी शासकीय मध्यवर्ती हॉस्पिटलमधील समाजसेवा अधिक्षक डॉ. सतिश वाघ यांना फोन करून अवयवदानाबाबत माहिती घेतली. आम्हाला अवयवदान करण्याकरता रितसर नोंदणी करावयाची असून आपण आपल्या हॉस्पिटलच्या टीमसह विवाहस्थळी येण्यास विनंती केली. डॉ. सतिश वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाफर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नेत्र चिकित्सक डॉ. दिलीप अहिरे, डॉ.प्रणाली बोबडे, डॉ.,फरीन अन्सारी यांच्यासोबत विवाहस्थळ गाठले. प्रांजल पाटिल व तिचे पती कोमलसिंह यांची अवयवदानाची नोंदणी करून घेतली. त्यांना सतीश वाघ यांच्या हस्ते अवयवदानचे कार्ड देण्यात आले. विशेष म्हणजे दृष्टी नसतानाही प्रांजल हिने अवयवदान केल्याची प्रेरणा घेऊन सोहळ्यात आलेले नातेवाईक यांनीसुद्धा नोंदणी करुन अर्ज भरला. दृष्टी नसली तरी शरीरातील अनेक अवयव हे कामाचे असून त्यातून सात-आठ जणांचा जीव वाचू शकतो. ही दूरदृष्टी समोर ठेवून अवयवदान केल्याची माहिती प्रांजल पाटील हिने दिली.

- Advertisement -

सुरुवातीला त्यांचे वडील एल. बी. पाटील आणि आई ज्योती पाटील खचून गेले. मात्र त्या परिस्थितीत देखील प्रांजलची शिक्षणासाठी असलेली धडपड बघून त्यांनी स्वतःला सावरले. त्यांना उल्हासनगरच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षणाची संधी असताना त्यांनी मुंबईच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि सर्वसामान्य लोकांसारखा उल्हासनगर – मुंबई लोकल प्रवास केला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयाचा पर्याय निवडला. यावरून त्यांची कोणतेही आव्हान स्वीकारण्याची वृत्ती दिसून येते. पुढे शिक्षणाचे एक-एक शिखर सर करत युपएससी परीक्षा त्या दोनदा उत्तीर्ण झाल्या. उल्हासनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -