Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE सीईटीचे अर्ज भरण्यासाठी आणखी एक संधी; २६ मेपासून लिंक पुन्हा सुरु 

सीईटीचे अर्ज भरण्यासाठी आणखी एक संधी; २६ मेपासून लिंक पुन्हा सुरु 

Subscribe

विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावेत, यासाठी २६ मे ते १ जूनदरम्यान सीईटी सेलकडून पुन्हा लिंक सुरु करण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनमुळे ज्या विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये एमएचटी सीईटीचे अर्ज भरता आले नाही, नोंदणी केली, पण अर्ज अर्धवट भरला, शुल्क भरता आले नाही, कागदपत्रे अपलोड करता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून आणखी एक संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावेत, यासाठी २६ मे ते १ जूनदरम्यान सीईटी सेलकडून पुन्हा लिंक सुरु करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी सीईटीही पुढे ढकलली आहे. नव्या वेळापत्रकानुसार या परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार आहेत. राज्यभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. दरवर्षी पेक्षा यंदा या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर राज्याबाहेरचे विद्यार्थी १६ हजार ९६२ नोंदणी केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांना ७ मार्चपर्यंत अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनाकडून होत होती.

- Advertisement -

त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी ७ मार्चपर्यंत अर्ज अपुरे स्थितीत भरले होते. अशा ६ हजार ४१८ विद्यार्थ्यांना २३ मेपर्यंत अर्ज पूर्ण करून शुल्क भरण्याची संधी सीईटी सेलकडून देण्यात आली होती. त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे अर्ज भरता आले नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होती. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावा, यासाठी २६ मे ते १ जूनदरम्यान mchtcet2020.mahaonline.gov.in ही लिंक पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. ही लिंक २६ मे रोजी पहाटे १२ वाजून १ मिनिटांनी ही लिंक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ही लिंक १ जूनला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी बंद होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ही अखेरची संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती सीईटी सेलकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -