घरCORONA UPDATECorona: अभिनेता अर्जुन रामपालची पालिकेला पीपीई किट्सची मदत

Corona: अभिनेता अर्जुन रामपालची पालिकेला पीपीई किट्सची मदत

Subscribe

अर्जुन रामपाल याने मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्स तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिले आहे. यासंबंधीची माहिती त्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी आरोग्य आणि प्रशासनावरही त्यांच्या सेवा-सुविधांच्या तरतुदींची जबाबदारी वाढते. मात्र या संकटसमयी अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन शासनाला मदतीचा हात दिला आहे. यामुळे बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचे नाव आता समोर येत आहे. अर्जुन रामपाल याने मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्स तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स देण्याचे जाहीर केले आहे. यासंबंधीची माहिती त्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे अर्जुनने

मी तुम्हा सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्याची विनंती करत आहे. खरा नायक तिथे आहे (डॉक्टर आणि परिचारिका). त्यांना पीपीई मिळणे गरजेचे आहे. त्यांचे आरोग्य रोजच धोक्यात येत आहे मात्र ते रुग्णांची काळजी घेत आहेत. दुर्दैवाने ते आवश्यक असलेल्या सुविधांपासून वंचित आहेत. ज्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते. जर आपल्यापैकी प्रत्येकजण या फक्त एक गणवेश दान करू शकत असेल तर ते आपल्या सैनिकांना सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. कृपया मदतीसाठी हात पुढे करा, त्यांना याची आवश्यकता आहे आणि आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे अर्जुनने लोकांना आवाहन केले आहे. यापूर्वीही अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योजक यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यचा निधीला मदत देऊ केली आहे.

हेही वाचा –

CoronaVirus : सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या देशात भारताचाही समावेश!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -