पंकजा मुंडे समर्थकांनी केला औरंगाबाद येथील भाजप कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Attempt by Pankaj Munde supporters to vandalize BJP office in Aurangabad
माजी मंत्री पंकजा मुंडे

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. औरंगाबादमद्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी तीन कार्याकर्त्यांना तब्यात घेतले आहे.

भाजपाने पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र ऐनवेळी पंकजा मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्याने समर्थक नाराज झाले असून आक्रमक झाले आहेत. त्यातूनच समर्थकांनी औरंगाबादमधील उस्मानपुरा येथील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

समर्थकांचा आरोप काय?

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी आज भाजपविरोधातच आंदोलन केले. आक्रमक झालेल्या या समर्थकांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून ठाण्यात नेले. यावेळी समर्थकांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ज्या भाजपाला ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओळख मिळवून दिली. त्याच मुंडेंच्या लेकीला, ओबीसींच्या नेत्या पंकजाताईंना डावलण्याचे काम केले जाते आहे. येणाऱ्या काळात भाजपाला हे परवडणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पंकजा समर्थकांनी व्यक्त केली.