बेस्टची ‘मिशन शून्य मृत्यू’ अभियानाच्या अंतर्गत जनजागृती

कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करून मुंबईकरांना ' बेस्ट' सेवासुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसगड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व अपघातांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रस्ते सुरक्षितता सप्ताह निमित्त 'मिशन शून्य मृत्यू' अभियान हाती घेतले आहे.

मुंबई : कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करून मुंबईकरांना ‘ बेस्ट’ सेवासुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसगड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व अपघातांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रस्ते सुरक्षितता सप्ताह निमित्त ‘मिशन शून्य मृत्यू’ अभियान हाती घेतले आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, बेस्टच्या बसगाड्यांमध्ये अपघाताच्या घटना टाळणे, अपघात झाल्यास मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे व त्यासाठी जनजागृती करणारे माहितीदर्शक स्टीकर्स स्वतः लावून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. (Awareness under BEST Mission Zero Death campaign)

बेस्ट उपक्रमातर्फे दरवर्षी रस्ते सुरक्षितता सप्ताह पाळण्यात येतो. यानिमित्त बेस्ट उपक्रमामार्फत जनप्रबोधन केले जाते. त्यासाठी बेस्ट उपक्रम दरवर्षी विविध उपक्रम राबवते. बेस्ट परिवहन विभागाने यंदा ‘मिशन शून्य मृत्यू’ अभियानाच्या अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून जनजागृतीपर संदेश देण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला आहे. महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी बेस्टच्या बसगाड्यांत माहितीदर्शक स्टीकर्स लावण्यात आले. याद्वारे अपघात झालाच तर काय करावे? याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत दररोज लहान -मोठे अपघात घडतच असतात. या अपघातांमध्ये बेस्ट बसमुळे होणाऱ्या अपघातांच्या काही घटनांचाही समावेश असतो. या अपघातांचा मोठा आर्थिक फटका बेस्ट उपक्रमाला बसत असतो. तसेच, जर बेस्ट बसच्या अपघातात बस चालकाच्या दुर्लक्षामुळे अथवा हलगर्जीपणामुळे जिवीत हानी झाल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम भरपाई द्यावी लागते. तसेच, बस चालकाला तुरुंगात जावे लागते. बेस्ट उपक्रमाचे नावही खराब होते, बदनाम होते. एकूणच बेस्ट उपक्रमाला मनःस्ताप सहन करावा लागतो.

बेस्ट बस चालवताना बस चालकाने वाहन सुरक्षितपणे चालविल्यास व एकही अपघात होऊ न दिल्यास त्या बस चालकाचे बेस्ट उपक्रमाकडून त्या चालकाचे विशेष कौतूक करण्यात येते. याच अनुषंगाने, बेस्ट बसगड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व अपघातांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रस्ते सुरक्षितता सप्ताह निमित्त ‘मिशन शून्य मृत्यू’ अभियान हाती घेतले आहे.


हेही वाचा – …तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल; राऊतांचा केशव उपाध्येंना इशारा