घरमुंबईएस्परर बायोरिसर्चने मुंबईत सुरु केले 'हेल्थ सप्लिमेंट'

एस्परर बायोरिसर्चने मुंबईत सुरु केले ‘हेल्थ सप्लिमेंट’

Subscribe

रुग्णाला योग्य पद्धतीचा आहार मिळाला आणि वेळच्या वेळी औषधं मिळाली तर किमान कॅन्सर रुग्णांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारतातील कॅन्सर रुग्णांतील पोषणमूल्यांच्या कमतरतेबद्दलच्या सबळ संशोधनातून 'एस्परर बायोरिसर्च'ने मुंबईत २ हेल्थ सप्लिमेंट सुरू केल्या आहेत.

एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर तो हळूहळू शरीराच्या अनेक अवयवांना होतो. त्यातून रुग्णाचं वजन आणि आयुष्य कमी होत‌‌ जातं. पण, जर रुग्णाला योग्य पद्धतीचा आहार मिळाला आणि वेळच्या वेळी औषधं मिळाली तर किमान कॅन्सर रुग्णांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारतातील कॅन्सर रुग्णांतील पोषणमूल्यांच्या कमतरतेबद्दलच्या सबळ संशोधनातून ‘एस्परर बायोरिसर्च’ने मुंबईत २ हेल्थ सप्लिमेंट सुरू केल्या आहेत. एस-फोर्टिटुड (पोषण, संरक्षण आणि रिकव्हरी) तर, एस-इन्व्हिगर (बेस फॉर्म्युला). या दोन सप्लिमेंटच्या सेवनाने कॅन्सर रुग्ण उत्तम प्रकारे जगू शकेल असं सांगण्यात आलं आहे. कॅन्सर आजारावरील उपचारातील मुख्य थेरपीची परिणामकारकता वाढवणं, हे या सप्लिमेंटचे उद्दिष्ट आहे.

यामुळे रुग्णाच्या जीवनाला धोका पोहोचतो

कॅन्सरचा जसजसा शरीरात प्रभाव वाढतो तसतसा कॅकेक्सिया हा सिंड्रोमही वाढत जातो. त्यामुळे, रुग्णाच्या जीवनाला धोका पोहोचू शकतो आणि अशक्तपणा आणि मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे, उपचार आणि रिकव्हरीच्या दरम्यान या टप्प्यांसाठी शरीर चांगलं असणं गरजेचे आहे. त्यासाठी शरीरातील पेशींना पोषण गरजेचे असते.

- Advertisement -

एकूण शरीराच्या वजनापैकी २५ ते ३० टक्के वजन घटले की कॅन्सर कॅकेक्सिया असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होतो. केमोथेरपीमुळे झालेल्या अॅनिमियाच्या घटनेतही वाढत होते. भारतातीयांचे पोट हाय प्रोटिन पचवण्यासाठी योग्य नसल्याने सध्याच्या व्हे प्रोटिन लोडमुळे जुलाब होतात आणि अमिनो अॅसिडच्या रुपात डायजेस्टेड प्रोटिनच्या बाबतीत तडजोड केली जाते. पोटाची शोषून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने केमोथेरपी दरम्यान ही गंभीर वैद्यकीय चिंता ठरते. त्यामुळे, केमो लोड कमी करण्यासाठी भारतीय पोटासाठी बायोव्हॅली इन्क्युबेशन कौन्सिलमध्ये एस्पररला कॅन्सर थेरपीमध्ये साह्यकारी न्यूट्रिशन कंपनी म्हणून गौरवण्यात आले आहे.  अमित श्रीवास्तव, बायोव्हॅली इन्क्युबेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी

लंग कॅन्सरचं प्रमाण अधिक

बेंगळुरूतील यूएस-एफडीए मान्यताप्राप्त अशा प्रकारे उपचार दिले जात‌ आहेत. पाहणीनुसार, पुरुषांमध्ये आढळलेल्या आघाडीच्या तीन कॅन्सर प्रकारांमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल प्रोस्टेट, तोंड, लॅरिंक्स, इसोफेगस यांचा समावेश आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे. त्यानंतर, कर्व्हिकल आणि ओव्हरिअन कॅन्सर यांचे प्रमाण सर्व प्रदेशांमध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तंबाखू, मावा, पाणीपुरी तोंडाच्या कॅन्सरचे सोबती

हेही वाचा – कॅन्सरग्रस्त रुग्णांचे समुपदेशन आवश्यक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -