घरमुंबईब्लॅकमेल करणारा तोतया आरपीएफ जवान गजाआड

ब्लॅकमेल करणारा तोतया आरपीएफ जवान गजाआड

Subscribe

गुरुवारी अशाच एका तोतया आरपीएफ जवानाला चर्चगेट आरपीएफ जवानांनी एका प्रेमयुगूलाला ब्लॅकमेलिंग करताना रंगेहाथ पकडून जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबई : लोकलमधून तुम्ही आपल्या प्रेयसीला घेऊन जात असाल तर सावधगिरी बाळगा. कारण लोकलमध्ये तोतया आरपीएफ जवानांची टोळी सक्रिय झाली आहे. गुरुवारी अशाच एका तोतया आरपीएफ जवानाला चर्चगेट आरपीएफ जवानांनी एका प्रेमयुगूलाला ब्लॅकमेलिंग करताना रंगेहाथ पकडून जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. दीपक विष्णू जावळे असे या तोतया जवानाचे नाव आहे.

चर्चगेटहून बोरीवलीला जाणार्‍या धीम्या लोकलमध्ये शुभम गुप्ता नावाचा तरुण मैत्रीणीसोबत प्रवास करत होता. तेव्हा तोतया आरपीएफ जवानाने त्यांचे फोटो काढून तुम्हाला 1250 रुपये दंड भरावा लागेल. अन्यथा तुमच्या आई-वडिलांना बोलवावे लागेल, असे सांगून मरिन लाईन स्थानकांवर उतरवले. या दरम्यान,शुभम आणि त्याची मैत्रीण खूप घाबरले होते. तुमची उगाच बदनामी होईल. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे द्या, असे म्हटल्यावर शुभमने खिशातून 200 रुपये देऊन सुटका करून घेतली. शुभमने तक्रार केल्यावर चर्चगेटचे आरपीएफ पोलीस निरीक्षक विनीत कुमार घटनास्थळी आले. त्यांनी त्या तोतया आरपीएफ जवानाला चर्चगेट स्थानकात अटक केली.

- Advertisement -

लोकल प्रवास करीत असताना जर तुम्हाला कोणही ब्लॅकमेलिंग करीत असेल तर घाबरून जाऊ नका. रेल्वे स्थानकांवर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरपी पोलिसांकडे तक्रार करा. जेणेकरून अशा तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळता येतील.  – विनीत कुमार, पोलीस निरीक्षक, आरपीएफ चर्चगेट.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -