Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई महापालिकेची वेबसाईट 'या' दिवशी २४ तासांसाठी राहणार बंद

महापालिकेची वेबसाईट ‘या’ दिवशी २४ तासांसाठी राहणार बंद

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेने काही तांत्रिक कामासाठी १३ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी बंद राहणार आहे. याची माहिती मुंबई महानरपालिके जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांची काहीशी गैरसोय होणार आहे. मात्र पालिकेचे संकेतस्थळ बंद होण्यापूर्वी अथवा ते पुन्हा सुरु झाल्यावर आपले कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या वेबसाईटबाबत तांत्रिक व परिरक्षण विषयक कार्यवाही आणि अद्ययावतीकरण कामकाजासाठी प्रक्रियेसाठी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ या कालावधीत म्हणजे २४ तासांसाठी मुंबई महापालिकेचे वेबसाईट बंद ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या कारणाने वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा सदर २४ तासांच्या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत. सर्व नागरिक, वापरकर्ते, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच कंत्राटदार, निविदाकार यांना विनंती करण्यात येते की, वेबसाईट बंद राहण्याच्या कालावधीची नोंद घेवून त्यानुसार वेबसाईटशी निगडित आपल्या कामकाजाचे नियोजन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -