मुंबई महापालिका १०० व्हेंटिलेटर, तीन ऑक्सिजन टँक खरेदी करणार

BMC

मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक व्हेंटिलेटरची कमतरता दूर करण्यासाठी १०० व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा आणि ऑक्सिजनच्या तीन टँकची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका त्यासाठी १७ कोटी २७ लाख ५० हजार रुपये खर्च करणार आहे. पालिकेने या व्हेंटिलेटर खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

सर्व व्हेंटिलेटर पालिकेच्या ज्या रुग्णालयात व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे तेथे आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या जंबो कोविड सेंटरमध्ये वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे कोविडबाधित परंतु गंभीर अवस्थेतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, ज्या रुग्णालयात श्वसनाचा अधिक त्रास आहे अशा रुग्णांसाठी आवश्यक ठरणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पालिका ऑक्सिजनच्या तीन टँकची व्यवस्था करणार आहे. त्यासाठी ९३ लाख ७२ हजार रुपये खर्चण्यात येणार आहेत.