घरमुंबईमरेची धमाल ऑफर! बॉटल क्रश करा, १ रुपया मिळवा!

मरेची धमाल ऑफर! बॉटल क्रश करा, १ रुपया मिळवा!

Subscribe

प्लास्टिक बंदीवर सामान्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना रेल्वे प्रशासनाकडून मात्र यावर एक नामी शक्कल लढवण्यात आली आहे. मुंबईतल्या विविध रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रशर मशिन बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये एक बॉटल क्रश केल्यानंतर रेल्वेच्या विशिष्ट अॅपमध्ये १ रूपया जमा होणार आहे.

सरकारने शनिवारपासून राज्यासह मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी लागू केली. प्लास्टिक बंदीला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. काही ठिकाणी निर्णयाचं स्वागत करत कापडी किंवा कागदी पिशव्या दिसल्या. तर काही ठिकाणी प्लास्टिकला सरकारने पर्याय काय दिला आहे? अशी विचारणाही झाली. एकीकडे जनतेकडून अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच सरकारी पातळीवर मात्र प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनानं प्लास्टिक बंदीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पाण्याच्या किंवा कोल्ड्रिंक्सच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात किंवा कुठेही न फेकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जावी यासाठी रेल्वेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

बॉटल क्रशर मशिन

प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बॉटल क्रशर मशिन रेल्वे स्थानकांवर बसवले आहे. यामध्ये रिकाम्या बाटल्या क्रश केल्यानंतर प्लास्टिक कचरा तर कमी होईलच, पण वर एक रूपयाचा फायदाही होणार आहे!

- Advertisement -

कसा कराल‌ वापर?

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात बॉटल क्रशर मशिन बसवण्यात आली आहे. या मशिनचा वापर केल्यानंतर मध्य रेल्वेच्याच एका अॅपवरुन तुम्हाला पॉईंट मिळतो. एक पॉईंट म्हणजे एक रुपया तुम्हाला मिळतो. या मशिनमध्ये अनेक प्रकारचे प्लास्टिक क्रश होऊ शकते. जसे की, प्लास्टिक बॉटल्स, कप्स, प्लेट्स इ.

या स्थानकांवर क्रश मशिन

आयआरसीटीसीकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सीएसएमटी, कल्याण, मुंबई सेंट्रल, दादर आणि एलटीटी या स्थानकांवर क्रशर मशिन बसवण्यात आली आहेत. या स्थानकांमधल्या सर्व स्टेशन मास्टर आणि तिकीट तपासणीसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

मटणाची चिंता नको!

दरम्यान, प्लास्टिक बंद झाल्यानंतर आता मटण कशात आणायचं? अशा प्रकारचे काही विनोद व्हायरल होऊ लागले होते. मात्र, एका मटण विक्रेत्याने यावर नामी शक्कल लढवली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर या विनोदासोबतच व्हायरल होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -