घरताज्या घडामोडीगोरेगावमधील ईगल बेकरीच्या बांधकामावर बुलडोझर

गोरेगावमधील ईगल बेकरीच्या बांधकामावर बुलडोझर

Subscribe

गोरेगावमधील जवाहर नगरमध्ये असलेल्या अनधिकृत ईगल बेकरी, हुक्कापार्लरसह इतर खेळांच्या बांधकामांवर महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासूनचे हे अनधिकृत बांधकाम असून यावर कारवाई करत येथील तळ अधिक पोटमाळ्यावर असलेल्या सुमारे १२ हजार चौरस फुटांचे क्षेत्रफळ मोकळे केले. मागील मार्च महिन्यापासून कोविडमुळे विभागातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. परंतु कोविडच्या काळातही महापालिकेने आता अनधिकृत बांधकामांकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. गोरेगावमधील कोविडमधील पहिली मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

गोरेगाव जवाहर नगरमधील पोलिस स्टेशनवरील इमारतीच्या एका मोकळ्या जागेवर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सुमारे सहा हजार चौरस फुटाच्या जागेवर हे अनधिकृत बांधकाम केले होते. याच बांधकामावर पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्याठिकाणी ईगल बेकरी तसेच हुक्कापार्लरसह अन्य वापर होत होता.

- Advertisement -

याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व प्रकारचे सोपस्कार  तथा सुनावणी पार पडल्यानंतर या बांधकामाला फेब्रुवारीला नोटीस बजावण्यात आली होती. कोविडमुळे ही कारवाई करता आलेली नव्हती. मात्र,आता कोविडमधून उसंत मिळताच महापालिकेच्या पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्या नेतृत्वाखाली इमारत व कारखाने विभागाचे कार्यकारी अभियंता  संजय सोनावणे, सहायक अभियंता मंदार , दुय्यम अभियंता परेश शहा आदींच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोस्वामी यांच्यासह १० पोलिस अधिकारी तसेच २५ हून पोलिस उपस्थित होते.


हेही वाचा – धक्कादायक! दारूचा ग्लास सांडला म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -