घरताज्या घडामोडीभारतीय रेल्वेच्या पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचे अव्वल स्थान कायम

भारतीय रेल्वेच्या पार्सल उत्पन्नात मध्य रेल्वेचे अव्वल स्थान कायम

Subscribe

एप्रिल-२०२१ ते नोव्हेंबर-२०२१ या कालावधीत पार्सल वाहतुकीतून २००.७७ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये पार्सल महसूलात प्रथम क्रमांकाचे स्थान पक्के केले आहे. मध्य रेल्वेला नोव्हेंबर-२०२१ महिन्यात पार्सल द्वारा रु. २६.३७ कोटी महसूल प्राप्त झाले. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पार्सल महसूल रु. २००.७७ कोटी प्राप्त झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १८२% अधिक आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२१ या कालावधीत ४.६४ लाख टन वाहतूक पार्सल द्वारा करण्यात आली. पार्सल वाहतुकीतील वाढ मुख्यत्वे नाशवंत वस्तूंची वाहतूक देशाच्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत किसान रेलच्या यशस्वीपणे चालवून केली जात असल्यामुळेच होते आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये (एप्रिल ते नोव्हेंबर), किसान रेलने २.०६ लाख टन वाहतूक करून विविध गंतव्यस्थानांवर ५८१ फेऱ्या केल्या आणि रु. ७९.५३ कोटींचा महसूल मिळवला. किसान रेलच्या सुरूवातीपासून आतापर्यंत किसान रेलच्या ८०८ फे-या चालविण्यात आल्या आहेत, ज्यामधून २.७८ लाख टन वाहतूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्री अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, रेल्वेने पार्सल वाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध सर्वात सुरक्षित, जलद आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय आहे. ते म्हणाले की, मध्य रेल्वेने आपल्या सर्व विभागांमध्ये व्यवसाय विकास युनिट स्थापन करून केलेल्या प्रयत्नांमुळे व्यावसायिक, व्यापारी आणि डीलर्सना त्यांच्या मालाची त्वरीत वाहतूक करणे सोपे झाले आहे.

- Advertisement -

किसान रेलमधील पार्सल वाहतूक प्रामुख्याने सांगोला, मनमाड, नाशिक, भुसावळ, रावेर, सावदा ते दानापूर, मुझफ्फरपूर, दिल्ली (आदर्शनगर), शालिमार इ. ठीकाणी होते. सोलापूर विभागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिरची, लातूर आणि उस्मानाबाद विभागातील फुले, नाशिक विभागातील कांदा, भुसावळ विभागातील केळी, नागपूर विभागातील संत्री, इतर फळे आणि भाजीपाला दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या दूरच्या बाजारपेठेत किसान रेलद्वारे त्वरित, ताजे आणि सुरक्षितपणे पोहोचते. किसान रेल्वेद्वारे मालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेसह चांगला महसूल, उत्पादनाला चांगला भाव, जलद वाहतूक, किमान वाया जाणारा माल असा मोठा फायदा होतो. किसान रेल हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे.

अलीकडेच, गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया दरम्यान सहा वर्षांच्या कालावधीसाठी पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेनचा नवीन भाडेपट्टा करार करण्यात आला आहे. मुंबई ते शालिमार दरम्यान वेळापत्रकानुसार पार्सल विशेष ट्रेन धावत असून दररोज ३५५ टन पार्सल वाहून नेत आहे आणि चालू वर्षात अंदाजे रु. २८.३० कोटी उत्पन्न प्राप्त झाले आहे. रेल्वे दुधाचे टँकर नागपूर ते दिल्ली दरम्यान नेले जात असून त्यातून आर्थिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबर पर्यंत रु. १३२ लाख उत्पन्न प्राप्त झाले आहे.. गेल्या दीड वर्षात पार्सल वाहतुकीसाठी २२ नवीन स्थानके उघडण्यात आली असून त्यात गेल्या वर्षीपासून केवळ कोविड काळात उघडलेल्या १९ स्थानकांचा समावेश आहे.


हे ही वाचा -शिवसेनेचा पराभव करु शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचाही करु शकतो, ओवैसींचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -