घरमुंबईworli gas cylinder blast : वरळीतील गॅस सिलेंडर दुर्घटनेतील 'त्या' चार महिन्याच्या...

worli gas cylinder blast : वरळीतील गॅस सिलेंडर दुर्घटनेतील ‘त्या’ चार महिन्याच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

वरळी येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या मंगेश पुरी ( ४ महिने) या लहान मुलाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या गॅस सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटनेत पुरी कुटुंबातील आनंद पुरी (२७) मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) असे चारजण जखमी झाले होते. त्यापैकी मंगेश पुरी व आनंद पुरी हे गंभीर जखमी झाले होते.

या जखमींना तात्काळ उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार देण्यास नायर रुग्णालय प्रशासनाने दिरंगाई केली, असा आरोप एका व्हायरल व्हिडीओद्वारे करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर याप्रकरणाची रूग्णालय प्रशासनाकडून तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आता या दुर्घटनेतील गंभीर जखमी लहान मुलाचा मृत्यू झाल्याने त्या मुलाला वेळेत उपचार दिले गेले की खरंच काही दिरंगाई झाली, याबाबतचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले आनंद पुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर जखमी विद्या पुरी (५०% – ६०%) आणि जखमी विष्णू पुरी ( १५% – २०%) यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू; चौकशी, कारवाई करा -: भाजप

वरळी येथील गॅस सिलिंडर दुर्घटनेतील जखमींना नायर रुग्णालयात उपचार देण्यात अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यामुळेच मंगेश पुरी (४) या लहान मुलाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
या घटनेप्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -