घरमुंबईसीईटी सेलकडे अर्ज दुरुस्तीसाठी 40 हजार अर्ज

सीईटी सेलकडे अर्ज दुरुस्तीसाठी 40 हजार अर्ज

Subscribe

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत अभ्यासक्रमांच्या घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेकडे अर्जामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्यभरातून तब्बल 40 हजार अर्ज आले आहेत. सीईटी सेलकडून उभारलेल्या सेतू सुविधा केंद्रावरून विद्यार्थ्यांना या दुरुस्ती करता येतील अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

सीईटी परीक्षेतील महत्त्वाच्या असलेल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी या अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला चार लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. मात्र हे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांकडून काही चुका झालेल्या होत्या. अर्जामधून काही विद्यार्थ्यांकडून स्वत:च्या, आई वडिलांच्या किंवा आडनावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांकडून घराचा पत्ता लिहण्यात चुक झाली तर काही विद्यार्थ्यांकडून कॉलेजचे नाव त्याचा पत्ता लिहिण्यात चुक झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र सीईटी सेलकडून या विद्यार्थ्यांकडून शपथपत्र घेऊन त्यांना परीक्षा बसण्यास परवानगी देण्यात आली होती.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी दिलेले शपथपत्र सीईटी सेलकडून सध्या स्कॅन करण्यात येत आहे. स्कॅन करण्यात आलेले हे शपथपत्र सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडू उभारलेल्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन शपथपत्राच्या माध्यमातून आपल्या अर्जाची चुका दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. शपथपत्र लॉगिनमध्ये टाकल्याने सेतू सुविधा केंद्रावरील अधिकार्‍यांना व विद्यार्थ्यांना दिसणार आहे. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रावर तातडीने अर्जात बदल करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना शपथपत्र घेऊन परीक्षेला बसण्यास परवानगी दिली असली तरी त्यांना अर्जात बदल करणे गरजेचे असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्यातून तब्बल 40 हजार अर्ज सीईटी सेलकडे करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -