घरमुंबईछत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार उठणार

छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार उठणार

Subscribe

क्रॉफर्ड मार्केट समोरील आणि जे.जे.उड्डाणपुलाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज घाऊक मासे विक्रीच्या मंडईची इमारत २०१४मध्ये प्रथम धोकादायक झाली होती.

कॉफ्रड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार भरल्या जाणार्‍या शिवाजी महाराज मंडईची वास्तू धोकादायक बनली असून या मंडईतील सर्व मासे विक्रेत्यांचे आता मानखुर्द-ऐरोली येथील जकात नाक्याच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी ही इमारत धोकादायक झाल्यानंतर तळ मजला कायम राखून उर्वरीत मजले तोडण्यात आले होते. त्यामुळे या मासे विक्रेत्यांचे पुनर्वसन क्रॉफर्ड मार्केटमध्ये करण्याची मागणी होत होती. परंतु क्रॉफर्ड मार्केटचा रखडलेला विकास आणि अपुरी पडणारी जागा लक्षात घेता प्रशासनाने हे मच्छिमार्केट मानखुर्दला ऐरोलीच्या जकात नाक्याच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

४३० विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय

क्रॉफर्ड मार्केट समोरील आणि जे.जे.उड्डाणपुलाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज घाऊक मासे विक्रीच्या मंडईची इमारत २०१४मध्ये प्रथम धोकादायक झाली होती. त्यामुळे या इमारतीतील वरच्या मजल्यावरील महापालिकेची सर्व कार्यालय इतर ठिकाणी स्थलांतरीत करून तळ मजल्यावरील मासे विक्रीचा व्यवसाय कायम ठेवला होता. या मंडईच्या इमारतीचे तोडकाम करताना दर सहा महिन्यांनी याचे स्ट्क्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केलेल्या ऑडीटमध्ये तळ मजल्याचे बांधकामही धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यानुसार मंडईतील घाऊक बाजार तिथून हटवून ही जागा रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बाजारातील तब्ब्ल ४३० विक्रेत्यांना आता थेट मानखुर्द-ऐरोलीतील जकात नाक्याच्या जागेवर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील दीड लाख चौरस फुट क्षेत्रफळाच्या जागेवर या विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे आता मुंबईतील घाउुक मासे घेवून येणार्‍या ट्कांमुळे मुंबईत होणारी वाहनांची कोंडी कमी होईल.तसेच या परिसरात या ट्कांमुळे होणारी वाहनाची गर्दीही कमी होईल,असे बोलले जात आहे.

- Advertisement -

ऐरोली जकात नाक्यांवर बसणार बाजार

याबाबत बाजार विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याची कबुली दिली. त्यामुळे या मंडईतील विक्रेत्यांना मानखुर्द-ऐरोली जकात नाक्याच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या मंडईतील गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी दीड लाख चौरस फुट क्षेत्रफळाची गरज आहे. त्यातुलनेत क्रॉफर्ड मार्केट मध्ये केवळ ५५ हजार चौरस फुट क्षेत्रफळाची जागा आहे.शिवाय या मंडईच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे तिथे पुनर्वसन करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मानखुर्द-ऐरोली जकात नाक्याच्या जागेत हा बाजार बसवल्यास ट्क हे वेशीबाहेरच थांबले जाणार आहे. ज्यामुळे ट्कमुळे होणारी गर्दी व वाहतूक कोंडी कमी होईल. या ट्कमुळे २ कि.मी अंतराचा रस्ता बंद होतो. तेही थांबेल. यामुळे लोकांचा त्रास कमी होईल आणि पर्यायाने प्रदुषणही कमी होईल,असे हसनाळे यांनी स्पष्ट केले.

२०१४ मध्ये तत्कालिन महापौर सुनील प्रभू यांनी मंडईची इमारत धोकादायक ठरल्यानंतर मासळी बाजार कायम ठेवून उर्वरीत कार्यालये स्थलांतरीत करत वरचे माळे तोडले जावे,असा तोडगा सुचवला होता. त्यानुसार वरील तीन ते चार मजल्यांचे बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. परंतु तळ मजल्यावर मासळी बाजार असल्याने वरील सर्व मजले हे शास्त्रोक्तपणे तोडले जात आहेत. परंतु या तोडकामामध्ये ही वास्तू अजुन धोकादायक बनल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -