भररस्त्यात उर्फी जावेदने केले असे काही…; चित्रा वाघ यांची थेट पोलिसांत धाव

चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त विवेक फळसाणकर यांची भेट घेतली. उर्फी जावेदवर कारवाई करावी, असे पत्र वाघ यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. उर्फी जावेदने मुंबईतील रस्त्यांवर अंग प्रदर्शन केले. समाजमाध्यमांवर तिने त्याचे फोटे टाकले. त्याची चर्चा झाली. मात्र घटनेत दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हिन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीला, सभ्यतेला कलंक लावणरे आहे, असा आरोप वाघ यांनी पत्रात केला आहे.

chitra wagh slams Minister of State for Home Affairs shambhuraj desai over stone pelting during kolhapur rally
गृहराज्य मंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही तर गुंडावर, बलात्काऱ्यांवर असावी; चित्रा वाघ यांचा टीका

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेदने मुंबईतील रस्त्यात अंग प्रदर्शन केल्याचा आरोप तिच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त विवेक फळसाणकर यांची भेट घेतली. उर्फी जावेदवर कारवाई करावी, असे पत्र वाघ यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. उर्फी जावेदने मुंबईतील रस्त्यांवर अंग प्रदर्शन केले. समाजमाध्यमांवर तिने त्याचे फोटे टाकले. त्याची चर्चा झाली. मात्र घटनेत दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हिन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीला, सभ्यतेला कलंक लावणरे आहे, असा आरोप वाघ यांनी पत्रात केला आहे.

अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे, असे वाघ यांंनी पत्रात नमूद केले आहे.

कारवाईचे हे पत्र देण्यासाठी वाघ यांनी पोलीस आयुक्त यांची शनिवारी भेट घेतली होती. त्यामुळे या मागणीच्या आधारे पोलीस उर्फी जावेदवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण याआधीही उर्फी जावेद सोशल मिडियावर तिच्या कपड्यांवरून चर्चेत राहिली आहे.

 माझ्या कपड्यांव्यतिरिक्त अजूनही बरेच मुद्दे आहेत- उर्फी जावेद

आताच्या राजकीय नेत्यांबद्दल मला खूप दुःख वाटत आहे. माझ्या कपड्यांवर आक्षेप घेतला जात आहे. माझे कपडे बलात्कारासाठी प्रवृत्त करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. किती सोयीने माझ्या कपड्यांचा अर्थ लावला जातोय. बेरोजगारी, खून, बलात्काराचे प्रलंबित खटले, असे अनेक मुद्दे आहेत. या मुद्द्यांचे काय, असा पलटवार उर्फी जावदेने वाघ यांच्या पोलीस तक्रारीवर केला आहे.