घरताज्या घडामोडीठाकरे सरकारकडून नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी जाहीर

ठाकरे सरकारकडून नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी जाहीर

Subscribe

नायर रुग्णालयाचा आज शतकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थिती होते. यावेळी नायर रुग्णालयाला आज १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडून १०० कोटींचा निधी जाहीर केला. तसेच कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टर्ससह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत त्यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. मी पहिला ही बोललो होतो की, मंदिर, प्रार्थना स्थळे बंद आहेत. मग देव कुठे आहे? तर देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रुपात आपला जीव वाचवण्यासाठी आलेला देव आहे. हा खरा देव आहे, जो आपला जीव वाचतोय. रुग्णालय हे मंदिरासारखेच आहे. जसं आपण व्यथा घेऊन मंदिरात जातो, तसं कधीतरी आपण दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन रुग्णालयात येतो. मग आपल्यावर उपचार केले जातात. त्यानंतर हसत-खेळत रुग्ण घरी जातात. त्यामुळे कौतुकाचे खरे मानकरी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे मुंबई मॉडेलसह महाराष्ट्राचे कौतुक केले जात आहे.’ यावेळीच उद्धव ठाकरे नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी जाहीर केला.

- Advertisement -

नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, आमदार यामिनी जाधव, नायर डिन रमेश भारमल, नगरसेविका संध्या जोशी यांच्यासह इतर नेते उपस्थितीत होते.


हेही वाचा – MPSC Exam 2020 : MPSC च्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा, राज्य सरकारचा आदेश


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -