घरमुंबईबहुजन महापार्टीचे चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

बहुजन महापार्टीचे चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Subscribe

पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन महापार्टीचे उमेदवार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन महापार्टीचे उमेदवार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून एबी फॉर्ममध्ये खाडाखोड करून उमेदवारी अर्ज दाखल केल्या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी पाटील यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

एबी फॉर्ममध्ये खाडाखोड

महापार्टीकडून अपक्ष ठरलेले उमेदवार राजू लडे हे आदिवासी उमेदवार असल्याने ते माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह हिसकावून घेण्याची चांगली संधी असल्याने सेनेने या प्रकरणात उडी घेतली होती. बहुजन महापार्टीचे उमेदवार चेतन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराने पक्षाने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस स्थानकात भादवी कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद केला होता. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणं मांडून तो बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

बविआला धक्का 

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) जबरदस्त झटका बसल आहे. निवडणुक आयोगाने त्यांचं ‘शिट्टी’ हे निवडणुक चिन्हंच गोठवलंय. त्यांना आता रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं ‘शिट्टी’ हे निवडणुक चिन्हं निवडणुक आयोगाने गोठवलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -