Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई CoronaVirus: चेंबूर ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट; BMC ने दिला इशारा

CoronaVirus: चेंबूर ठरतंय कोरोनाचं हॉटस्पॉट; BMC ने दिला इशारा

चेंबूरमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ; पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता?

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. कोरोनाच्या नियमांचे मुंबईच्या नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच मुंबईची लाईफ लाईन सर्वसामान्यांना सुरू केल्यापासून मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क बेफिकीर वावरणाऱ्या चेंबूरमधील नागरिकांच्या याच बेफिकीरपणाला लगाम घालण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांमध्ये चेंबूरमधील तब्बल ५५० इमारतींवर पालिकेने नोटीस बजावली असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास इमारत सील करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

मुंबईच्या चेंबूर भागात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता लॉकडाऊन देखील लागू करण्याची शक्यता आहे. कोरोना प्रकरणात सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चेंबूर परिसरातील वॉर्डमध्ये आठवडाभरापूर्वी दररोज १५ पेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद केली जात होती, मात्र आता ती संख्या २५ झाली आहे. प्रभागातील कोरोनामधील रुग्णांचा वाढीचा दर ०.२८ टक्के आहे, जो संपूर्ण मुंबईसाठी ०.१४ टक्क्यांहून अधिक आहे.

- Advertisement -

तर मुंबई महापालिकेच्या ‘एम-पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९८ टक्के रुग्ण निवासी इमारतीमध्ये असल्याचे आढळले आहे. तसेच इमारतींमध्ये कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसविण्यात येत असून पुन्हा एकदा इमारतींमधील बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या परिस्थितीत बेजबाबदारपणे वागणाऱ्या इमारतींमधील नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय ‘एम-पश्चिम’ विभागाने घेतला आहे. ‘एम-पश्चिम’ विभागाने गेल्या पाच दिवसांमध्ये तब्बल ५५० इमारतींवर नोटीस बजावली आहे.

अशी आहे नोटीस

  • सोसायटी बाहेरील व्यक्तींना सोसायटीमध्ये मर्यादित प्रवेश द्यावा
  • सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची शारीरिक तापमान तपासणी करावी
  • इमारतीमधील रहिवाशाला कोरोनाची बाधा झाल्यास नियमानुसार १४ दिवस विलगीकरण बंधनकारक करावे
  • बाधिताच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी
  • कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रहिवाशांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी
- Advertisement -

अशाप्रकारचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास इमारतीला सील करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

- Advertisement -