घरमुंबई'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार'मध्ये विनामास्क गर्दी; पालिकेची कारवाई

‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’मध्ये विनामास्क गर्दी; पालिकेची कारवाई

Subscribe

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’ या हॉटेलवर पालिकेच्या पथकाने अचानकपणे धाड टाकली. यावेळी, कोरोना नियमांना पायदळी तुडवून विनामास्क गर्दी करणाऱ्या २४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधितांविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर.सुद्धा नोंदवविण्यात आला आहे.

मुंबईत सरकार, महापालिका यांच्या अथक प्रयत्नांमुळे जानेवारीपर्यंत कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून ते आतापर्यंत नागरिकांच्या बेफिकीरीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मुंबईतील काही ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हादरलेल्या सरकार व पालिका प्रशासनाने
गर्दीची ठिकाणे असलेल्या, क्लब, जिमखाना, हॉटेल, बार, हॉल, मॉल आदी ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा वारंवार दिला होता. मात्र, तरीही कोरोना नियमांचे उल्लंघन सुरूच आहे.

- Advertisement -

ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलमध्ये कोरोना नियमांना पायदळी तुडवून विनामास्क गर्दी करण्यात आल्याची खबर पालिका प्रशासनाला लागली. त्यावर पालिकेच्या धडक पथकाने बुधवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलकडे धाव घेऊन धाड टाकली. त्यावेळी त्या ठिकाणी तब्बल २४५ नागरिकांनी विनामास्क गर्दी केल्याचे आढळून आले. तसेच, त्यांनी गर्दी केल्यामुळे सामाजिक अंतर राखण्याबाबत घालून दिलेल्या नियमाचेही उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने पालिकेने कायदेशीर कारवाई केली.

- Advertisement -

त्यामुळे पालिका पथकाने याप्रकरणी बेजबाबदारपणे वागणाऱ्या २४५ नागरिकांवर विनामास्क आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करून १९ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला. तसेच, सदर व्यक्तींनी कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी केल्याने संबंधितांच्या विरोधात एफ.आय.आर. दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी ‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’ या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा याच हॉटेलमध्ये गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -