घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे १२७६ नवे रुग्ण; ४९ रुग्णांचा आज मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे १२७६ नवे रुग्ण; ४९ रुग्णांचा आज मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये बुधवारी १२७६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार २६२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४१७ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या मागील आठवडयापासून रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, बुधवारी कोरोना रुग्ण संख्या ४३ हजार २६२ एवढी झाली आहे.

मुंबईमध्ये बुधवारी ४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २७ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखाली आहे. २७ जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ७९५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३३ हजार २२० वर पोहचली आहे. तसेच २५९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १७ हजार ४७२ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, चक्रीवादळ आणि पाऊस यामुळे येत्या काही दिवसात कोरोना आजाराबरोबर पावसाळी आजार देखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यामुळे मुंबईकरानी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -