घरमुंबईधक्कादायक! शिवडीत रुग्णालयाच्या शौचालयात सापडला Corona रुग्णाचा कुजलेला मृतदेह

धक्कादायक! शिवडीत रुग्णालयाच्या शौचालयात सापडला Corona रुग्णाचा कुजलेला मृतदेह

Subscribe

१४ दिवस मृतदेह तिथे पडून होता आणि याबद्दल कोणालाही माहिती नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात असून रुग्णालयाचा बेजाबाबजदरपणा उघड

गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईमधील शिवडी येथील टीबी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. शिवडी येथील शौचालयामध्ये कुजलेल मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान १४ दिवस मृतदेह तिथे पडून होता आणि याबद्दल कोणालाही माहिती नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात असून रुग्णालयाचा बेजाबाबजदरपणा उघड झाला आहे.

असा घडला प्रकार

शिवडी येथील रुग्णालयामध्ये एका २७ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. या मृती व्यक्तीचं नाव सूर्यभान तेज बहादुर यादव असून तो आरे कॉलनी येथे राहणारा होता. ३० सप्टेंबर रोजी सूर्यभान यादव कोविड पॉझिटिव्ह आला ज्याच्या नंतर त्याला शिवडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल. ४ ऑक्टोबरला टीबी रुग्णालय प्रशासनाने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये सूर्यभान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण सूर्यभानचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयातच कुजलेल्या अवस्थेत १४ दिवसापासून पडून असल्याचे समजले. रुग्णालयाला याबाबत कोणतीच माहिती नसल्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

- Advertisement -

टीबी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने एक कुजलेला मृतदेह सापडल्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रचंड दुर्गंधी आणि सहज ओळख पटविणे मुश्किल अशी मृतदेहाची अवस्था झाली होती. यामुळे रुग्णाची ओळख पटवणंही कठीण झाले असून स्त्री आहे की पुरुष याची माहिती मिळवण्यासाठी रेकॉर्ड तपासण्यात आला. यावेळी २७ वर्षीय सुर्यभान यादव नावाचा रुग्ण ४ ऑक्टोबरपासून वॉर्डमधून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. रुग्णालय प्रशासनाच्या नोंदी आणि इतर सर्व तपासल्यानंतर या व्यक्तीची ओळख पटली. मृत व्यक्ती याच रुग्णालयात उपचार घेत होता असे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. तसेच सूर्यभान यादव यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. सूर्यभानच्या मृत्यूने यांचावर दुःखाचा डोंगर तर कोसळला असून घरचा कमावणारा आधारही हरपला आहे.


मुंबईत सिटी सेंटर मॉलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; घटनास्थळी आदित्य ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -