घरमहाराष्ट्रनाशिकसगळ्याच धरणांवर खेकड्यांची तपासणी होणार

सगळ्याच धरणांवर खेकड्यांची तपासणी होणार

Subscribe

खेकड्यांमुळे धरण फुटू शकते असे संशोधन असलेला अहवाल 'आपलं महानगर'ने प्रसिद्ध केल्यानंतर आता राज्यातील सर्वच धरणांवर खेकड्यांच्या शोध सुरु झाला आहे. या संदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आले.

खेकड्यांमुळे धरण फुटू शकते असे संशोधन असलेला अहवाल ‘आपलं महानगर’ने गुरुवारी (ता. ११) प्रसिद्ध केल्यानंतर आता राज्यातील सर्वच धरणांवर खेकड्यांच्या शोध सुरु झाला आहे. या संदर्भात सर्व आज अधीक्षक अभियंत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आले.

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले असा दावा जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यांनतर त्यांची सर्वत्र खिल्ली उडवण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने सावंत यांच्या निवासस्थानी खेकडे सोडले तर कुणी पोलीस ठाण्यांमध्ये खेकडे नेत या गुन्हेगारांना शिक्षा द्या, अशी उपरोधिक मागणी केली. त्यातच महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी)चे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी खेकड्यांमुळे धरण फ़ुटूच शकत नाही, असा दावा केल्यानंतर हा मुद्दा अधिक पेटला.

- Advertisement -

सर्वच लहान मोठ्या धरणांमधील खेकड्यांसंदर्भातील माहिती लवकरात लवकर अहवाल स्वरूपात कळवण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यासाठी आम्ही आता तज्ञ् अभियंत्यांच्या आणि संशोधकांच्या या माध्यमातुन तपासणी सुरु केली आहे.
– राजेंद्र मोरे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

आपलं महानगर ने या विषयांची दुसरी बाजू जाणून घेत मेरीतील निवृत्त वैज्ञानिक नामदेव पठाडे यांच्याशी संपर्क साधत त्यांचा संशोधन अहवाल अभ्यासला. पठाडे यांनी वाघेरे लघुपाटबंधारे प्रकल्प आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका डावा तट कालव्याचे २००१ ते २००४ दरम्यान संशोधन केले आहे.

- Advertisement -

या दोन्ही धरणांत खेकड्यांच्या प्रादुर्भाव त्यांना आढळून आला. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यांनतर धरणाची गळती कमी झाल्याचा निष्कर्षही या संशोधनात नोंदवण्यात आला होता. तिवरे धरणफुटी ही खेकड्यांमुळे झाली, असा दावा पठाडे यांनी केला नसला तरीही धरण सुरक्षिततेत खेकड्यांच्या मुद्दा प्राधान्याने घ्यायला हवा, असे मत त्यांनी मांडले. या संदर्भात आपलं महानगर ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जलसंपदा विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील अधीक्षक अभियंत्यांना सूचित करीत आपल्या कार्यकक्षेतील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशित केले आहे. याशिवाय मेरीमधूनही यापूर्वीच्या संशोधनांची माहिती मागविण्यात आली आहे.

सर्वच प्रकारच्या धरणांना धोका

मातीच्या धारणांनाच खेकड्यांपासून धोका असतो, अशी चर्चा आहे. मात्र, नामदेव पठाडे यांच्या संशोधनात सर्वच प्रकारच्या धरणांना खेकड्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. खेकडे मातीत बीळ करू शकतात, त्याचच ताकदीने मुरुमही पोखरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सगळ्याच धरणांवर खेकड्यांची तपासणी होणार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -