घरक्रीडाजगभरातून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर सचिनने मानले 'असे' आभार...

जगभरातून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर सचिनने मानले ‘असे’ आभार…

Subscribe

भारतीय संघाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव अशा बऱ्याच नावांनी प्रसिद्ध असलेल्या सचिन तेडुलकरने सोमवारी (24 एप्रिल 2023) वयाचे अर्धशतक पूर्ण केले. क्रिकेटच्या देवाचा 50वा वाढदिवस असल्याने सर्व क्रिकेटप्रेमींनी सचिनच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधीच त्याचा वाढदिवस साजरा केला.

भारतीय संघाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव अशा बऱ्याच नावांनी प्रसिद्ध असलेल्या सचिन तेडुलकरने सोमवारी (24 एप्रिल 2023) वयाचे अर्धशतक पूर्ण केले. क्रिकेटच्या देवाचा 50वा वाढदिवस असल्याने सर्व क्रिकेटप्रेमींनी सचिनच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधीच त्याचा वाढदिवस साजरा केला. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी सचिनला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांनतर आता सचिन भारावून गेला असून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. (Cricketer Sachin Tendulkar Thanks Everyone For Special Birthday Wishes)

ट्विटरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर यांने सर्वांचे आभार मानले. मैदानावर जिंकलेल्या ट्रॉफी महत्त्वाच्या आहेतच, मात्र त्याचबरोबर मैदानाबाहेरची मैत्री आणि प्रेम हे आयुष्य खास बनवते. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आपुलकी ही माझ्यासाठी खूपच आनंददायी होती. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पाठवलेले फोटो, व्हिडीओ आणि संदेश खूपच खास होते, त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सचिनने म्हटले.

- Advertisement -

‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो. मी ५० वर्षांचा नाही. मी २५ वर्षांचा अनुभव असलेला अवघा २५ वर्षांचा माणूस आहे’, असेही सचिनने शेवटी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा असते की, त्याला क्रिकेट देव भेटावा. क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. आपण पाहिले असेलच आयपीएलच्या मैदानात सचिन दिसला तरी, स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांकडून सचिन… सचिन… असा नारा दिला जातो. पण साक्षात हाच देव जर समोर आला तर, आनंद गगनात मावत नाही.

- Advertisement -

सचिन तेडुलकर यांने सोमवारी (24 एप्रिल 2023) वयाचे अर्धशतक पूर्ण केले. खरंतर 50वा वाढदिवस असल्याने दोन दिवस अगोदरच सेलिब्रेशन सुरू होतं. पण आपला वाढदिवस सचिन याने कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या एका हॉटेलमध्ये साजरा केला.


हेही वाचा – साक्षात ‘क्रिकेटचा देव’ भेटला अन् चिमुरडा चाहता झाला थक्क; सचिनची ‘ही’ अनोखी भेट होतेय व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -