घरताज्या घडामोडीDrug Case : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ? जात प्रमाणपत्र पडताळणीची होतेय...

Drug Case : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ? जात प्रमाणपत्र पडताळणीची होतेय मागणी

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडणचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाहीए. वानखेडेंच्या मालमत्तेवरून आणि महागड्या कपड्यांवरून नवाब मलिक यांनी टीका केली होती. त्यातच नवाब मलिक यांचे लाखो रूपयांचे टी शर्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हायरल करण्यात आले. अशातच आता समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागासवर्गीय संघटनांकडूनच ही मागणी जोर धरू लागली आहे. दलित संघटनांपैकी भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिक पार्टीने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणी करण्याची मागणी करणारे पत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला लिहिले आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचीही पडताळणी करण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांनी महार जातीचा चुकीचा आणि खोटा दाखला मिळवून त्या आधारावर युपीएससीत अनुसूचित जाती कोट्याअंतर्गत २००८ साली नोकरी मिळवली. आयआरएस अधिकारी म्हणून कस्टम आणि सेंट्रल एक्साईज विभागात त्यांनी खोटी माहिती व पुरावे सादर करत नोकरी मिळवली, असे दोन्ही संघटनांनी पत्रात म्हटले आहे. भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीने समीर वानखेडे यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्याविरोधात हाच आरोप केला आहे. वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर करत ही नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. वानखेडे यांनी एका अनुसूचित जमातीच्या उमेदवाराचा हक्क हिरावून घेतला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे एका उमेदवाराची युपीएससीतील संधी हुकली असेही नवाब मलिक म्हणाले. दलित संघटनांनी आता हीच मागणी करत वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा आरोप केला आहे.


समीर वानखेडे घालतात १ लाखाचं टीशर्ट? फोटो होतोय व्हायरल

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -