घरमुंबईकोट्यवधी रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार आणि फसवणूक

कोट्यवधी रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार आणि फसवणूक

Subscribe

गुजरातला पळून गेलेल्या हिरे दलालास अटक

कोट्यवधी रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या क्षितिज भन्साली नावाच्या एका 32 वर्षांच्या हिरे दलालास बीकेसी पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हिर्‍यांना चांगली किंमत मिळवून देण्याचे आमिष दाखवून क्षितिजने आतापर्यंत सात हिरे व्यापार्‍यांना सुमारे एक कोटी रुपयांचा गंड घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचे वांद्रे येथील बीकेसी, भरत डायमंड बोर्समध्ये एक खाजगी कार्यालय आहे. एप्रिल 2017 रोजी त्यांची एका परिचित व्यक्तीच्या मदतीने क्षितिजशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो हिरे दलाल असून त्याच्या संपर्कात अनेक हिरे व्यापारी आहेत. त्यांच्या मदतीने आपण त्यांच्याकडील हिर्‍यांना चांगली किंमत मिळवून देऊ असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्याला काही हिरे दिले होते. एक महिन्यांत हिरे किंवा हिर्‍याच्या विक्रीतून आलेले पेमेंट कार्यालयात जमा करु असे त्याने आश्वासन दिले होते.

- Advertisement -

मात्र काही महिने उलटूनही क्षितिज हा आला नाही. त्याच्याविषयी माहिती काढल्यानंतर तो पळून गेल्याचे त्यांना समजले होते. त्याने त्यांच्यासह इतर सात हिरे व्यापार्‍यांना अशाच प्रकारे बतावणी करुन त्यांच्याकडून हिरे घेतले होते. या हिर्‍यांचा अपहार करुन तो मुंबईतून गुजरातला पळून गेला होता. आतापर्यंत त्याने सात हिरे व्यापार्‍याकडून सुमारे एक कोटी रुपयांचे हिरे घेतले होते.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी क्षितीज भन्सालीविरुद्ध 406, 420 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याला गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -