घरमुंबईकिंग्ज सर्कल परिसर पुरमुक्त होण्यासाठी मे २०२२ उजाडणार

किंग्ज सर्कल परिसर पुरमुक्त होण्यासाठी मे २०२२ उजाडणार

Subscribe

चार पंपिंग स्टेशनच्या कामांना १ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात होणार असून हे काम ३१ मे २०२२ रोजी पूर्ण होणार आहे.

मुंबईत दरवर्षी जास्त पाऊस पडला की, किंग्ज सर्कल सारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचते. त्याचा त्रास दरवर्षी येथील नागरिकांना होत असतो. यावर उपाययोजना म्हणून माहुल येथे मोठे पंपिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्यास फारच उशीर होत आहे. त्यामुळे आता त्यावर उतारा म्हणून चार ठिकाणी ‘मिनी पंपिंग ‘स्टेशन उभारण्यात येणार आहेत. मात्र या ‘मिनी पंपिंग’ स्टेशनचे काम १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार असून ते काम ३१ मे २०२२ रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी किंग्ज सर्कल परिसरातील नागरिकांना आणि येथील गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच पर्याय नाही.

माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक जागा मिळण्यात काही कायदेशीर व तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने किंग्ज सर्कल, गांधी मार्केट येथे दरवर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होतात आणि त्याचे परिणाम रस्ते वाहतुकीवर होत असतात. मात्र २०१६ पासून ते आजपर्यंत पालिकेला माहुल पंपिंग स्टेशन उभारता आलेले नाही. आता जागेची अडचण आल्याने नेमक्या या मुद्द्याला हात घालून भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी, माहुल पंपिंग स्टेशनचे काम जागे अभावी रखडणार अडल्याची खंत स्थायी समितीच्या ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत व्यक्त करून त्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती प्रशासनाकडे मागितली होती. त्यावर पालिकेने शिरसाट यांना लिखित उत्तर दिले असून त्यामध्ये माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्यात विलंब होत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

आता पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागामार्फत किंग्ज सर्कल परिसर पुरमुक्त करण्यासाठी ‘एफ/ उत्तर’ येथील जे. के. केमिकल नाला, खार क्रीक नाला, ‘बी’ विभागातील मॉलेट बंदर, व ओएनजीसी ( बीपीटी विभाग) अशा चार ठिकाणी ‘मिनी पंपिंग’ स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या चार पंपिंग स्टेशनच्या कामांना १ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात होणार असून हे काम ३१ मे २०२२ रोजी पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास गांधी मार्केटव आजूबाजूचा परिसर, किडवाई मार्ग, वडाळा, वडाळा स्टेशन परिसर, मस्जिद बंदर, सरदार वल्लभ भाई पटेल मार्ग येथे दरवर्षी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी एकाच दिवशी ९४४ मिमी पाऊस पडला व समुद्रात मोठ्या भरतीमुळे साडेचार फुटांपेक्षा जास्त मोठ्या लाटा उसळल्या होत्या. मिठी नदी, नाले हे ओव्हरफ्लो होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली होती. त्यानंतर पालिकेने मिठी नदी, लहान, मोठे नाले यांची विकासकामे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ५ पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली. मात्र मोगरा व माहुल या पंपिंग स्टेशनची कामे प्रलंबित राहिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मास्कच्या नावाखाली क्लीन मार्शलांकडून वसुलीचा गोरखधंदा सुरु

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -