घरमुंबईसगळ्यांना सगळीकडे कार्यालये काढण्याचा अधिकार, आम्ही महाराष्ट्राचे कार्यालय यूपीत उघडू - अजित...

सगळ्यांना सगळीकडे कार्यालये काढण्याचा अधिकार, आम्ही महाराष्ट्राचे कार्यालय यूपीत उघडू – अजित पवार

Subscribe

कुणी कुठे कार्यालय काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत, त्याला आमचा विरोध नाही. आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले.

पक्षाच्या जनता दरबार उपक्रमाच्या निमित्ताने आज पवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येवर बोलताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त  आणि सहकार मंत्री आढावा घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो.राजद्रोह कलमाचा वापर करु नका असे  न्यायालयानने केंद्र। सरकारला सांगितले आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन केंद्र सरकार करणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावे हे सरकारचे काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जी काही माहिती त्यांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते आणि ती समिती निर्णय घेते,  असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी काँग्रेस चालवतात, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा पवार यांनी यावेळी समाचार घेतला. बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपच्या बोलणार्‍या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -