‘आरआरआर’ चित्रपट आता लवकरच OTT प्लॅटफार्मवर

सुप्रसिद्ध टॉलिवूड दिग्दर्शक राजामौली यांचा बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपट आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. जे प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहू शकले नाहीत. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला.

‘आरआरआर’ चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 1,127 करोड रूपयांची कमाई केली असून सर्वाधिक कमाई करणारा हा भारतातील तिसरा चित्रपट ठरला आहे. मात्र हिंदी भाषेत डब झालेल्या या चित्रपटाने 300 करोड कमावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

सूत्रांच्या माहितीनुसार ‘आरआरआर’ आता येत्या 20 मे रोजी Zee 5 या डिजीटल माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. Zee 5 चे प्रीमियर सगळ्या दाक्षिणात्य भाषांमध्ये होईल. तसेच ‘आरआरआर’ चे हिंदी संस्करण त्याच दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

‘आरआरआर’ हा चित्रपट ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि 2017 चा सीक्वेल ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या चित्रपटानंतर राजामौली यांचा तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे.

 


हेही वाचा :उर्मिला आणि आदिनाथच्या नात्यामध्ये दुरावा&#823!0;…..’हे’ आहे कारण