घरमुंबईअतिवृष्टीतील हानी टाळण्यासाठी सज्जता; मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

अतिवृष्टीतील हानी टाळण्यासाठी सज्जता; मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कालपासून आरे मेट्रो कारशेडपासून, शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णय घेतले जात आहे. यातच राज्यभरात आता मुसळधार पावसाने सुरवात केल्याने आता त्यासंदर्भात आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली. मुंबई आणि राज्यातील इतर शहरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात अतिवृष्टीमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजन करण्यासाठी विभागवार चर्चा झाली. सर्व विभाग अलर्ट असून समस्येला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. सगळ्यांनी आपआपली तयारी काय काय़ आहे हे बैठकीत सांगितली आहे. याशिवाय ज्या काही इजन्सी आहेत त्यांच्या टीम देखील वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचे नुकसान होणार नाही. दरड कोसळून दुर्घटनेची ठिकाणं ट्रॅक केली आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह, काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांच्या जेवणची, राहण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

- Advertisement -

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित, लष्कराच्या तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच हवामान विभाग, रेल्वे, बेस्ट, पालिका, जेएनपीटी आदींची उपस्थिती होते.

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर येथे पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पाणी साचण्याचा घटना सुरु आहे. यात हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली होती.


भाजप कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब! पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -