भाजप कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब! पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका

भाजप कार्यालयाबाहेरील फलकावरही अमित शाह यांचा फोटो नसल्याने आता उलट सुलट चर्चा सुरु आहेत

congress leader prithviraj chavan criticize deputy chief minister devendra fadnavis

राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. मात्र या सत्तासंघर्षाची भारतातच नव्हे तर जगभरात रंगली. एकनाथ शिंदे याच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होती, मात्र अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केले, तर फडणवीसांनी स्वत: या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपमध्ये काही तर आलबेल नसल्याची चर्चा रंगली. मुख्यमंत्री पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली.

यात आज भाजपकडून मुंबई कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला, या विजयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थिती दर्शवली. मात्र त्याच्या अनुपस्थितीवरून राजकारणात उलट-सुलट चर्चांना उधाण आले. फडणवीसांच्या या अनुपस्थितीवर आता काँग्रेसकडून जहरी टीका केली जात आहे. यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले की, मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा सुरु, पण नवरदेव गायब… . पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस नाराज

फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांना विनंती करत मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा सल्ला दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना फोन करत मंत्रिमंडळाच सहभगी होण्याची दोनदा विनंती केली. इतकेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सत्तातरणानंतर भाजपच्या गोटात सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे.

भाजप कार्यालयाबाहेरील फलकावरही अमित शाह यांचा फोटो नसल्याने आता उलट सुलट चर्चा सुरु आहेत. यात देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतून पंख कापण्यात आले की काय? अशी चर्चा देखील सुरु आहे. सोशल मीडियावरही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर जाण्यापासून का रोखले अशा चर्चा सुरु आहेत. राज्यसभा निवडणुकीपासून ते विधान परिषद निवडणुक भाजपला प्रत्येक वेळी जिंकून देण्यात फडणवीस यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र भाजपच सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्री पदापासून फडणवीसांना दूर ठेवण्यात आल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.


नुपूर शर्मांना भाजपकडून वाचवण्याचा प्रयत्न; ओवैसींचा आरोप