घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर दिशा पटानी म्हणते...

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर दिशा पटानी म्हणते…

Subscribe

आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर पहिल्यांदाच दिशा पटानीही प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते तिच्या चित्रपटातील अभिनय असो, तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे किंवा इंस्टाग्राम पोस्टमुळे. दरम्यान, दिशा पटानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिशा हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच तिने महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही महिन्यांपूर्वीच दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचे डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांबद्दल अनेक चर्चा झाल्या. तसेच त्यांच्या अफेअर्सचेही अंदाज लावले गेले. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत. आज देखील तिची मुलाखत घेण्यात आली आणि दिलेल्या मुलाखतीत दिशाने पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाली दिशा

ती म्हणाली की, ‘आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्ट आहे. ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.’


हेही वाचा – VIDEO – ही लढाई आहे…मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -