घरताज्या घडामोडीमहापालिका रुग्णालयांमध्ये समन्वयका अभावी खाटांचा घोळ; दूरध्वनीवरुन खाटेचा शोध

महापालिका रुग्णालयांमध्ये समन्वयका अभावी खाटांचा घोळ; दूरध्वनीवरुन खाटेचा शोध

Subscribe

कोरोना कोविडच्या मुख्य नियंत्रण कक्षात महापालिका आणि खासगी रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांच्या माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड बनवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात याची कार्यवाही सुरु होताच या नियंत्रण कक्षाचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक वॉर्डात वॉर रुम तयार करण्यात आले. परंतु, वॉर रुममध्ये डॅशबोर्ड नसून महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यामुळे वॉर रुमला या रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये समन्वयक नेमणे आवश्यक असून याअभावीच रुग्णालयातील रिकाम्या खाटांचा घोळ वाढून जनतेला मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाब समोर येत आहे.

कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांवर उपचार आणि उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने १९१६ची हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु, या हेल्पलाईनवर खाटांच्या उपलब्धतेबाबत विचारणा झाल्यानंतर मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकारी प्रत्येक रुग्णालयात संपर्क साधायचे. त्यामुळे खाटांचा शोधात जास्त वेळ होत असल्याने यासाठी सर्व रुग्णालयांमधील खाटांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डची संकल्पना राबवण्यात आली. या डॅशबोर्डद्वारे कुठल्या रुग्णालयात किती खाटा रिकामी आहेत याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

- Advertisement -

मुख्य नियंत्रण कक्षात डॅशबोर्ड कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेचे २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर रुम तयार केले. स्थानिक पातळीवरच कोविड रुग्णांना खाटांसह रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. परंतु, वॉर्डातील वॉर रुममध्ये डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध नसून त्यांना कोणत्या महापालिका आणि सरकारी रुग्णालयासंह खासगी रुग्णालयांमध्ये खाटा रिकाम्या आहेत याची माहिती होत नाही. त्यामुळे वॉर रुमच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयांमध्ये संपर्क केला जातो. परंतु, वॉर रुममधून होणाऱ्या विचारणासंदर्भात ठोस माहिती देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यामुळे वॉर रुमचा घोळात घोळ सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वॉर्डामध्ये वॉर रुम तयार करण्यात आले. त्यानुसार वॉर रुममधील कर्मचारी उपलब्ध यंत्रणेच्या आधारे योग्यप्रकारे काम करत आहेत. परंतु, महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये किती खाटा रिकाम्या आहेत, याची माहिती देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याची अर्थात समन्वयकाची नेमणूक न झाल्यामुळे वॉर रुमला रिकाम्या खाटांचा शोध घेण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे वॉर रुमची निर्मिती करताना, त्यांनी कुणाशी संपर्क साधावा, याकरता जबाबदार अधिकाऱ्याचा नंबरही द्यायला हवा. पण, तसे झालेले नाही. मुख्य नियंत्रण कक्षात डॅशबोर्ड असला तरी प्रत्येक वॉर्डाच्या वॉर रुममधून याठिकाणी संपर्क साधून खाटांची माहिती घ्यायची कि रुग्णालयांमधून, हेही स्पष्ट नाही. आजही वॉर रुममधील कर्मचारी रुग्णालयांमध्येच संपर्क साधत असून परिणामी रुग्णांना खाटांची माहिती तासनतांस उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोनातून महापालिका खूप काही शिकली, असे वाटत असले तरी पुन्हा एकदा सुरुवातीच्या काळाप्रमाणे रुग्णालयातील खाटा आणि रुग्णालय प्रवाशांची प्रक्रियेला विलंब होतानाच दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयांमध्ये एक समन्वयक नेमणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘एसटी मधील २७ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -