घरमुंबईवैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ड्रेसकोड सक्तीचा

वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ड्रेसकोड सक्तीचा

Subscribe

हिवाळी परीक्षेपासून निर्णय लागू

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातंर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आता पारंपरिक वेशात उपस्थित राहता येणार नाही. विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहताना ड्रेसकोड बंधनकारक केला आहे. हा निर्णय हिवाळी 2018 परीक्षेपासून लागू करण्यात येणार असून, उन्हाळी 2019 व त्यानंतर होणार्‍या परीक्षांसाठीची सुधारित नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणार्‍या राज्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यापूर्वी एक विशेष ड्रेसकोड सहा महिन्यांपूर्वी निश्चित केला होता. त्यावेळी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी वेगळा ड्रेसकोड निश्चित करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक नुकतेच एक परिपत्रक काढले आहे.

- Advertisement -

परिपत्रकानुसार विद्यापीठांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रावर उपस्थित राहताना कशाप्रकारे पोशाख असला पाहिजे यासंदर्भात निर्देश दिले आहेत. परिपत्रकानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनींना अर्ध्या बाहीचे फिक्या रंगाचे शर्ट किंवा टी शर्ट, फुल पॅन्ट असावे, तसेच शर्टाला छोटे बटण असून ते नक्षीदार नसावे, अंगठी, गळ्यातील साखळी यांसह अन्य कुठल्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेला येताना विद्यार्थी व विद्यार्थींनीला टोपी, गॉगल, बांगड्या, पीन, चेन, हार, हँड बॅग, वॉलेट, मनी पर्स, अ‍ॅप्रन व बूट वापरता येणार नाहीत. याबरोबरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात घड्याळ, मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणही नेता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

धार्मिक परंपरेशी संबंधित किंवा अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या महाविद्यालयांना सुद्धा परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरील ड्रेसकोड बंधनकार असेल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तपासणीनंतरच पारंपरिक पोशाख
विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावरील ड्रेसकोड व्यतिरिक्त ज्या विद्यार्थी व विद्यार्थींनीला सांस्कृतिक पारंपरिक पोशाख परीक्षेदरम्यान परिधान करावयाचा असेल त्यांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी पोशाख तपासणीसाठी एक तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -