मुंबईवरील पाणीटंचाईचे संकट दूर; तलावांतील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

मोडक सागर, तानसा आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्यानंतर आता अन्य चार जलाशय ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत.

lake- monsoon

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने तुफान बॅटींग केली आहे. तसेच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईवरील पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणी टंचाईचे संकट दुर गेले आहे. (due to heavy rainfall water storage lakes supply water Increased mumbai)

मोडक सागर, तानसा आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्यानंतर आता अन्य चार जलाशय ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या सहा वर्षांतील हा या दिवशीचा सर्वाधिक साठा आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ५४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही तलावांमध्ये सध्या ८६.६७ टक्के पाणीसाठा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेला पाणीसाठा गेल्या १५ दिवसात चांगलाच वाढला आहे. दरम्यान, मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. तलावांमध्ये पूर्ण क्षमतेने जलसाठा उपलब्ध असल्यास तर पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही.


हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘अग्निपथ’शी संबंधित सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग