घरमुंबईपोलिसांच्या सतर्कतेमुळे २ लाख रुपये किंमतीचे लग्नाचे दागिने मिळाले परत

पोलिसांच्या सतर्कतेमुळे २ लाख रुपये किंमतीचे लग्नाचे दागिने मिळाले परत

Subscribe

मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर महिला २ लाख रुपये किंमतीचे दागिने महिला रिक्षा मध्ये विसरली. मात्र पोलिसांनी काही तासांमध्येच दागिने परत मिळवून दिले.

मुलीच्या लग्नाकरिता बनविलेले २ लाख रुपये किंमतीचे दागिने एक महिला रिक्षा मध्ये विसरली होती. या बाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल अॅपचा मदत घेऊन शिताफीने रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि महिलेचे दागिने परत मिळवून दिले. मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर हा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी काही तासांमध्येच दागिने परत मिळवून दिले. उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

उल्हासनगर – ३ येथील कामगार हॉस्पिटलजवळ भोलानाथ कॉलनीमध्ये संगीता वेणूगोपाल शेट्टी (५०) ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. संगीताने तिच्या मुलीच्या लग्नासाठी सोने, चांदी आणि हिरेजडित असे २ लाख रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी उल्हासनगर – ३ येथून १७ सेक्शन ते शिरू चौक असा रिक्षाने प्रवास केला. यावेळी रिक्षात ते दागिन्यांची बॅग विसल्या. मुलीचे लग्न १८ मे रोजी होते त्यामुळे संगीता आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्यांनी हा सर्व प्रकार उल्हासनगर वाहतूक उपशाखाचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना सांगितला. चव्हाण यांनी संगीता यांना धीर देवून रिक्षा चालकाचे वर्णन विचारुन नंबर घेतला. याप्रकरणात त्यांनी वाहतूक वॉर्डन अशोक ननावरे आणि संजय आंधळे यांची मदत घेऊन पोलीस ठाण्यात गहाळ वस्तूबाबत नोंद करवून घेतली. सदर घटनेबाबत उल्हासनगर पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसिंग नं. ४६५/२०१९ प्रमाणे नोंद केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी असा लावला रिक्षा चालकाचा तपास

वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रिक्षा आणि चालकचा शोध शिरु चौकातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरु केला. दोन ते तीन तासात निघून गेलेले रिक्षा चालकाचा शोध वाहन अॅपमार्फत लावून रिक्षा चालकास पोलीस चौकीत बोलाविले. रिक्षा चालक चौकीत गेला. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘रिक्षा साफ करतांना ही बॅग मला मिळाली. मी ती पोलिसांकडे जमा करणारच होतो.’ त्यानंतर पोलिसांनी संगीता यांना नेहरू चौकीत बोलावून घेतले. सदर महिला आपले नातलगासह चौकीत हजर येवून तीने तीचे रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने असलेले बॅगेची तपासणी करुन खात्री केली. आपले दागिने परत मिळाल्याने महिला दुःख आणि आनंद अशा द्विधा अवस्थेत रडू लागली. तिने पोलसांचे आणि रिक्षाचालकाचे आभार मानले. महिलेने रिक्षा चालकाला बक्षीस देखील दिले. यावेळी रिक्षा चालक, मालक, युनियन पदाधिकारी, कार्यकर्ते, दुकानदार व पोलिस कर्मचारी हजर होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -