घरमुंबई"मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही!" अखेर एकनाथ शिंदेनी बंडखोरीमागची कहाणी उलगडली

“मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही!” अखेर एकनाथ शिंदेनी बंडखोरीमागची कहाणी उलगडली

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरी का केली? असा सवाल आजही लोकांच्या मनात कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी अखेर या बंडखोरीमागच्या कहाणीचा उलगडा केलाय.

Eknath Shinde On Rebellion : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशाच बदलली आणि राज्यात महासत्तांतर घडले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर लोकांनी नाराजीही व्यक्त केली. तर काहींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरी का केली? असा सवाल आजही लोकांच्या मनात कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अखेर या बंडखोरीमागच्या कहाणीचा उलगडा केलाय.

“मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही” असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केलंय. एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सत्तादेखील स्थापन केली. तेव्हापासून अनेक राजकीय नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य आणि तर्क-वितर्काचा भडीमार केल्यानं राजकीय वातावरण ढवळून गेलं. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या बंडखोरीमागची खरी कहाणी उलगडली. एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना एकनाथ शिंदे यांनी सत्तांतराबाबत मनमोकळ्यापणाने संवाद साधला.

- Advertisement -

‘मुख्यमंत्री व्हायचं हे कधी मनात आलं?’, असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री पदासाठी हे सर्व केलेलं नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही हा उठाव केला नाही. २०१९ मध्ये जनतेने जसा कौल दिला त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु यात आम्हाला यश मिळालं नाही. तर महाविकास आघाडीसोबत आमची गणितं जुळली नाहीत. यासाठी मी कुणाला दोष देत नाही. महाविकास आघाडीत आमची वैचारिक कोंडी झाली. कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे अशोक चव्हाण यांना विचारा, असंही त्यांनी सांगितलं.”

एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना-भाजपला लोकांनी कौल दिला होता आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं. परंतु लोकांच्या मताविरुद्ध सारं घडत होतं. लोक आमच्यासारखं बोलत नाही, ते मतांतून बोलत असतात. शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असं सर्वांना वाटत होतं. पण सत्तेसाठी तोडफोड करणारं भाजप नव्हे. यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. महाराष्ट्र राज्याचा विकास हेच डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय घेतला.”

- Advertisement -

बंडखोरीनंतर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेकांनी अगदी खालची पातळी गाठत माझ्यावर आरोप केले. पण माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही आरोप करत रहा, मी काम करत राहीन, असंच मी त्यांना म्हणत असतो. शेवटी तरुण पिढीसुद्धा आपलचं अनुकरण करणार आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप करताना प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -