घरमुंबईभारतात दरवर्षी सव्वालाख स्तन कर्करोगाचे रुग्ण

भारतात दरवर्षी सव्वालाख स्तन कर्करोगाचे रुग्ण

Subscribe

भारतात स्तन कर्करोगाविषयी अद्याप जागरूकता झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना साजरा केला जातो व या निमित्ताने मुंबई शहरामध्ये स्तनाच्या कर्करोगविषयी जागरूकता आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरीही शहरातील महिलांमध्ये याविषयी अजूनही जागरूकता आलेली नसल्याचे निरीक्षण बोरिवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या समूहाने नोंदविले आहे. ग्लोबोकॉनच्या सर्वेनुसार भारतात दरवर्षी १ लाख ३० हजार स्तन कर्करोगाचे नवीन रुग्ण वाढतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलची पश्चिम उपनगरात ४ अत्याधुनिक हॉस्पिटल्स तसेच मुलुंड येथे एक हॉस्पिटल असून अपेक्स समूहाने ऑक्टोबर महिन्यात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता आणण्यासाठी ५०० महिलांना याविषयी विचारले असता यातील फक्त २०० महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयी माहीत असल्याचे समजले. ३५ ते ५० वयोगटातील महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मधुमेह उच्च रक्तदाब तसेच हृदयविकार याविषयी जाणकारी असलेल्या या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग का होतो? कोणत्या वयात होतो तसेच यावर उपचार काय केले जातात याबाबतचे सखोल ज्ञान नसल्याचे दिसून आले. स्तनाचा कर्करोग म्हणजे लवकर मृत्यू अशी माहिती काही महिलांनी दिली. ग्लोबोकॉनच्या सर्वेनुसार दरवर्षी १ लाख ३० हजार महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होतो, तर २२ महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो व यातील ५० टक्के महिलांचा योग्य उपचाराअभावी अथवा कर्करोग तिसर्‍या टप्प्यात माहित झाल्यामुळे होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -