घरमुंबईअंधेरी येथे चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरी येथे चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

महिलेस पिटा कायद्यांतर्गत अटक; अभिनेत्रीची सुटका

अंधेरी येथे चालणार्‍या एका हायफाय सेक्स रॅकेटचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी शिफांजली चंद्रशेखर राव या 42 वर्षांच्या महिलेस पिटा कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका 33 वर्षीय अभिनेत्रीची सुटका केली असून मेडीकलनंतर तिला महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही ओशिवरा पोलिसांनी अशाच काही कारवाई करुन अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. जोगेश्वरीतील ऑफ लिंक रोडवरील मोरया इस्टेटजवळील आदर्शनगर, लष्करीया इमारतीमध्ये राहणारा हाशीम आणि शिफांजली नावाचे दोन दलाल काही महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी त्यांना संपर्क साधून त्याच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती.

यावेळी शिफाजंलीने काही तरुणींना दाखविण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे एक बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी या बोगस ग्राहकाला शिफांजली भेटली, तिने त्याच्याकडे साठ हजार रुपयांची मागणी केली, पैसे दिल्यानंतर या तरुणीची ओळख करुन दिली जाईल असे तिने सांगितले. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्याच्यात वीस हजार रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यानंतर तिने तिच्या फ्लॅटऐवजी दुसर्‍या ठिकाणी या तरुणीला घेऊन येते असे सांगून त्याला जोगेश्वरीत एक हॉटेल बुक करण्यास सांगितले होते. हॉटेलची माहिती मॅसेज केल्यांनतर काही वेळानंतर तिथे शिफाजंली आली आणि तिने त्याच्याकडून वीस हजार रुपये घेऊन त्याच्यासोबत एका महिलेला पाठविले. हा व्यवहार सुरु असतानाच एसीपी सुनिल बोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांच्या पथकातील रघुनाथ कदम, संदीप यादव, श्रीकांत तावडे, चेारट, धनंजय जाधव, माधुरी उल्हाळकर यांनी तिथे छापा टाकून शिफांजली राव या महिलेस अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी वीस हजार रुपयांची कॅश दोन मोबाईल आणि इतर वस्तू हस्तगत केली आहे.

- Advertisement -

या कारवाईत पोलिसांनी 33 वर्षांच्या महिलेस ताब्यात घेतले, तिच्या चौकशीत ती मालिका अभिनेत्री असून तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. तपासात शिफांजली ही गेल्या आठ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून तिने आतापर्यंत अनेक तरुणीसह महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले आहे. अनेकदा ती तिच्या घरी ग्राहकांना बोलावून तिथे सेक्स रॅकेट चालवित होती. मागणीनुसार ती ग्राहकांसोबत महिलांसह तरुणींना विविध हॉटेलमध्ये पाठवित होती. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. हाशीमला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -