घरCORONA UPDATEFake Vaccination:Tips इंडस्ट्रीजला बनावट लसीकरणाचा फटका, लस घेऊनही कर्मचाऱ्यांना मिळाले नाही सर्टिफिकेट

Fake Vaccination:Tips इंडस्ट्रीजला बनावट लसीकरणाचा फटका, लस घेऊनही कर्मचाऱ्यांना मिळाले नाही सर्टिफिकेट

Subscribe

प्रत्येक व्यक्तीचा डोस १२०० प्लस जीएसटी देऊन खरेदी करण्यात आला होता

देशात कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. लोकांच्या मनात लसीकरणाविषयी असलेली भिती काढून टाकण्यात सरकारला यश आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला. मात्र आता लसीकरणापुढे नवीन समस्या येऊन उभी राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून फेक लसीकरणाची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आलीत. बॉलिवूडमधील टिप्स इंडस्ट्री या बनावट लसीकरणाच्या जाळ्यात अडकली आहे. टिप्स इंडस्ट्रीचे(Tips Industries) मालक रमेश तौरानी यांनी त्यांच्या मुंबईमधील कंपनीच्या जवळपास ३६५ कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली होती. मात्र आपल्याला खोटी लस देण्यात आल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. आम्हाला कोव्हिशिल्ड लस म्हणून साधारण: स्टिरॉइड वॉटर देण्यात आले असावे,असे रमेश तौरानी यांनी सांगितले. (Fake Vaccination: ramesh taurani Tips Industries hit by fake vaccinations,employees do not get certificates despite vaccinations)

रमेश तौरानी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर आहेत. त्यांनी ३० मे आणि ३ जून रोजी त्यांच्या कंपनीमधील ३६५ कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले. लसीकरण केल्यानंतर त्यांच्यापैकी कोणालाही लसीकरण केल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले नाही. सर्टिफिकेट न मिळाल्याने रमेश यांना संशय आला. ते हैराण झाले आणि त्यांनी या विरोधात आवाज उठला.

- Advertisement -

आम्ही आजही लसीकरण सर्टिफिकेटची वाट पाहत आहोत. आम्ही लस घेऊन बरेच दिवस झालेत तरीही आम्हाला सर्टिफिकेट देण्यात आलेले नाही. मी व माझ्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी संजय गुप्ता एसपी इव्हेंट्सशी संपर्क केला असता त्यांनी १२ जून पर्यंत सर्टिफिकेट दिले जातील असे सांगितले. मात्र आजपर्यंत आम्हाला कोणतेही सर्टिफिकेट मिळालेले नाही. आम्हाला कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयातून सर्टिफिकेट मिळतील असे देखील सांगण्यात आले होते.मात्र अद्याप एकाही व्यक्तीचे सर्टिफिकेट आमच्यापर्यंत पोहचलेले नाही,असे रमेश तौरानी यांनी सांगितले.

कंपनीतील ३६५ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीचा डोस १२०० प्लस जीएसटी देऊन खरेदी करण्यात आला होता,असे रमेश तौरानी यांनी म्हटले आहे. पुढे रमेश यांनी असे म्हटले आहे की, आम्हा गेलेल्या पैशांची चिंता नाही आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता आहे. आम्हाला आता प्रश्न पडला आहे की आम्हा कोव्हिशिल्ड लसीच्या नावाखाली कोणती लस देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील बड्या सोसायट्यांमध्ये सुरुयं बनावट लसीकरण, पुरवठादारास उत्तरप्रदेशातून अटक

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -