घरमुंबईमुंबईतील लोकसभा निवडणूकीसाठी २१ हजार कर्मचारी, अधिकारी सज्ज

मुंबईतील लोकसभा निवडणूकीसाठी २१ हजार कर्मचारी, अधिकारी सज्ज

Subscribe

मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत लोकसभा निवडणूका पारदर्शी, नि:पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी २१ हजार कर्मचारी आणि अधिकारी सज्ज करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक २०१९ साठी मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत असलेल्या ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी २१ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असुन निवडणूका पारदर्शी, नि:पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवासी उपजिल्हा अधिकारी तथा कर्मचारी नियुक्ती विभागाचे समन्वयक संपत डावखर यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्हयातील मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघासाठी धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे १० विधानसभा मतदारसंघ आहेत.

‘निवडणूकीचे काम हे अतिशय महत्वाचे असुन या कामात गैरहजर राहणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. प्रथम प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या जवळपास १५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुध्द कार्यवाही प्रस्तावित केली आहे. याशिवाय संबंधितांच्या वास्तववादी अथवा निकडीची गरज लक्षात घेता काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या कामातुन सुट देण्यात आली आहे’. — संपत डावखर, माहिती निवासी उपजिल्हा अधिकारी 

कर्मचाऱ्यांची विभागणी

मतदान केंद्रावरील कर्मचारी, अधिकारी पासुन ते निवडणूक विषयक यंत्रणा हाताळणारे सर्व विभागाचे वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी हे सर्व मिळून जवळपास २१ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष ३१६२, प्रथम मतदान अधिकारी ३१६२, इतर मतदान अधिकारी ६३२४, क्षेत्रिय अधिकारी ४५०, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २६००, शिपाई ४००० तसेच या सर्वांना सहकार्य करण्यासाठी १२०० कार्यालयीन कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

५ केंद्रिय निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती

दरम्यान, निवडणूक आयोगामार्फत ५ केंद्रिय निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती केली असुन लवकरच ते मतदार संघात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. यात ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रसाद हे १९९५ च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमती शिल्पा गुप्ता हया मध्यप्रदेश कॅडरच्या २००८ च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेतील दिपक पुरोहित हे २००७ चे राजस्थान मध्ये आय.पी.एस. अधिकारी असुन त्यांच्याकडे ३०-मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण लोकसभा या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी आहे. तसेच भारतीय महसुल सेवेच्या २००५ च्या राजस्थान कॅडरचे संतोषकुमार करनानी यांच्याकडे ३१-मुंबई दक्षिणची जबबादारी असुन भारतीय रक्षा लेखा सेवेच्या २००४ च्या राजस्थान कॅडरचे अभिषेक शर्मा यांच्याकडे ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -