घरमुंबई‘या’ मराठी चित्रपटात फ्रेंच कलाकार

‘या’ मराठी चित्रपटात फ्रेंच कलाकार

Subscribe

तिशय वेगळे नाव असलेल्या आरॉन या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लॉन्च करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याच्या पोस्टरमध्येही वेगळेपण दिसून येतय.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘आरॉन’ या मराठी चित्रपटाचे वेगळेपण प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘आरॉन‘ नाव वाचून त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असणार असे प्रत्येकाच वाटत असेल. अतिशय वेगळे नाव असलेल्या आरॉन या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लॉन्च करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याच्या पोस्टरमध्येही वेगळेपण दिसून येतय. दोन परदेशी कलाकारांचे फोटो या पोस्टरमध्ये पाहून सगळ्यांना आर्श्चयचकित झाले आहेत. ते दोन्ही फ्रेंच कलाकार आहेत. बर्नाबास तोथ आणि अँटोनिएट फेकेटे अशी त्यांची नावे असून दोघांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

शशांक आणि नेहाची जोडी दिसणार

ऑरॉन या चित्रपटातून शशांक केतकर आणि नेहा जोशी अशी वेगळी जोडी दिसणार आहे. तर ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये याची ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वास्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली आहे. तर ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

- Advertisement -

७ डिसेंबरला होणार प्रदर्शित

अनेक चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. ‘आरॉन’ या चित्रपटाची हैदराबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पाँडिचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे देखील साऊथ आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली होती. तर कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भरलेल्या द वर्ल्ड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवल मध्ये ‘आरॉन’ ला “बेस्ट इन्स्पिरेशनल फॅमिली जर्नी’’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. येत्या ७ डिसेंबर २०१८ ला ‘आरॉन‘ महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -