घरमुंबईअंबरनाथच्या 'या' शाळेचं 'एक भारत श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेवर स्नेहसंमेलन संपन्न!

अंबरनाथच्या ‘या’ शाळेचं ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या संकल्पनेवर स्नेहसंमेलन संपन्न!

Subscribe

के. वि. अंबरनाथ विद्यालयाचे प्राचार्य दीपक सिंह भाटी यांनी आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे स्वागत करून विद्यालयातील महत्वपूर्ण माहिती सर्वांना सांगितली.

आयुध निर्माण परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. के. वि. अंबरनाथ विद्यालयाचे प्राचार्य दीपक सिंह भाटी यांनी आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थित पालकांचे स्वागत करून विद्यालयातील महत्वपूर्ण माहिती सर्वांना सांगितली.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समाजप्रबोधन

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉल ऑफ फेम, अॅक्शन सॉन्ग, नुक्कड नाटक, योग नृत्य, नाटक नृत्य, जर्मन गीत, मूक अभिनय, मणिपुरी नृत्य, थीम डांस यासारख्या अनेक बाबीमधून समाज प्रबोधनाचे काम विद्यार्थ्यांनी केले. ही संपूर्ण संकल्पना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’यावर आधारित होती. या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाजात नवचैतन्य जागृत करण्यासाठी बाल मजुरी, बेटीबचाव, बेटी पढाव, नारी सशक्तीकरण, मैत्री व जवानांनी दिलेले बलिदान याद्वारे सुद्धा समाज प्रबोधनाचे काम विद्यार्थ्यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडी महापालिकेच्या डंपरची धडक

प्रमुख पाहुण्यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

आयुध निर्माण अंबरनाथ महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा व विशेष अतिथी अंजु सिन्हा यांनी २०१८-१९च्या विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष कुमार सिन्हा, महाप्रबंधक आयुध निर्माण अंबरनाथ यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे उपप्राचार्य सुशीलकुमार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -